एंजेलिना जोलीच्या ‘या’ सिनेमाचा येतोय हिंदी ‘रिमेक’, ऐश्‍वर्या रायनं दिला ‘आवाज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वॉल्ट डिज्नी पिक्चर्स द्वारे निर्मित करण्यात आलेल्या ‘मेलफिकेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल या हॉलिवूड सिनेमाच्या हिंदी आवृत्तीतील अँजोलिना जोली हिच्या भूमिकेला भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने आवाज दिला आहे. तसेच याच्या इंग्रजी भागातील मुख्य पात्राला अँजोलिना जोली हिने आवाज दिला आहे.

डिज्नी इंडियाचे स्टूडियो एंटरटेनमेंटचे प्रमुख विक्रम दुग्गल यांनी याविषयी बोलताना सांगितले कि,ओरिजिनल सिनेमात मुख्य पात्राला अँजोलिना जोली हिचा आवाज असल्याने तिच्या आवाजाला ऐश्वर्या राय हिच्याव्यतिरिक्त कुणाचाही आवाज सूट होणार नाही.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, आम्ही हिंदीमध्ये देखील या सिनेमातील पात्रांना जिवंत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळेच आम्ही ऐश्वर्यासारख्या सर्वगुणसंपन्न अभिनेत्रीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘मेलफिकेंट: मिस्ट्रेस ऑफ इविल’ हा सिनेमा भारतात 18 ऑक्टोबर रोजी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Visit : Policenama.com