उत्पादन युनिट चीनहून भारतात शिफ्ट करण्याची ‘अ‍ॅपल’ची इच्छा, ट्रम्प म्हणाले – ‘अमेरिकेच्या बाहेर प्रॉडक्शन केल्यास लागणार टॅक्स’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  कोरोना विषाणू दरम्यान अमेरिकेसह अनेक देशांतील कंपन्यांना चीनमधून भारतात उत्पादन करणारे युनिट्स शिफ्ट करायचे आहेत. अमेरिकन कंपनी ऍपलनेही आपले प्रॉडक्शन युनिट चीनमधून भारतात शिफ्ट करण्याबाबत बोलले आहे. परंतु या दरम्यान अमेरिकेऐवजी भारत आणि आयर्लंडसारख्या देशांमध्ये जाणाऱ्या कंपन्यांवर नवीन कर लावू शकतात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

एका मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, कंपन्यांना त्यांचे उत्पादन व्यवसाय अमेरिकेत परत आणण्यासाठी कर प्रोत्साहन दिले होते. एका वृत्तानुसार ऍपलने म्हटले आहे की, आपल्या उत्पादनाचा महत्त्वपूर्ण भाग ते चीनहून भारतात शिफ्ट करू इच्छित आहेत. चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणू पसरल्यानंतर तेथील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे.

ते म्हणाले, “ऍपलने म्हटले आहे की आता ते भारतात जाणार आहेत. ते चीनवरून काही उत्पादन भारतात करणार आहेत. त्यांनी तसे केले तर आपण समजून जा की आम्ही ऍपलला जबरदस्त धक्का देणार आहोत, कारण ते आम्ही केलेल्या व्यवसायातील भाग असलेल्या कंपनीशी स्पर्धा करत आहेत. त्यामुळे हे ऍपलसाठी जरा अयोग्य आहे, परंतु आम्ही आता याची अनुमती देणार नाही. जर आम्ही इतर देशांप्रमाणेच आपल्या सीमा बंद केल्या, तर ऍपल अमेरिकेतच त्यांचे १०० टक्के उत्पादन करेल.”

“या कंपन्यांना समजून घ्यावे लागेल, कारण ते फक्त चीनलाच जात नाहीत. तुम्ही बघा ते कुठे चालले आहेत…ते भारतात चालले आहेत, आयर्लंडला जात आहे आणि ते सर्व ठिकाणी जात आहेत, ती त्यांना बनवेल,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प म्हणाले की, “मला ते करावे लागेल. प्रोत्साहन हे आहे कि जेव्हा ते अमेरिकेबाहेर उत्पादन करतील तेव्हा त्यांच्यावर कर लावला जाईल. आम्हाला त्यांच्यासाठी फारसे काही करण्याची गरज नाही. त्यांना आमच्यासाठीच करावे लागेल.” ट्रम्प म्हणाले की, त्यांना उत्पादन कंपन्यांना अमेरिकेत परत आणायचे आहे.