‘मलायका-अर्जुन’ची रोमँटीक डेट ‘फ्लॉप’, रेस्टॉरंटमधून लगेच जावं लागलं बाहेर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सर्वात चर्चित जोड्यांपैकी एक आहे. दीर्घकाळापासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे कपल एकत्र टाईम स्पेंड करताना दिसत असतं. अलीकडेच दोघं मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये आले होते. परंतु त्यांना लगेच तिथून निघून जावं लागलं. प्रकरण असं आहे की, दोघंही डिनर डेटसाठी आले होते. परंतु त्यांना तिथे बसण्यासाठी जागाच मिळाली नाही.

अशात मलयका आणि अर्जुनची डिनर डेट आता फ्लॉप झाली आहे. दोन्ही स्टार रेस्टॉरंटच्या बाहेर पडले. निघण्याआधी मात्र त्यांनी आपलं जेवण पॅक केलं होतं. कारण रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना मलायकाच्या हातात एक पार्सलही दिसत होतं. यावर दोघांचंही लक्ष होतं. सध्या मलायका-अर्जुनचे हे फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल होताना दिसत आहेत.

मलायका-अर्जुनच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन नेव्ही ब्लू टीशर्ट आणि मलायका व्हाईट कटआऊट ड्रेसमध्ये दिसली होती. दोघंही खूप छान दिसत होते. मलायकाचा नेहमीप्रमाणं बोल्ड अवतार दिसला.

अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो आशुतोष गोवारीकरच्या पानीपत सिनेमात दिसला होता. सिनेमात अनेक मोठे कलाकार असूनही सिनेमा अयशस्वी ठरला.