मलायका अरोराचा रस्ता अडवल्याने फोटोग्राफर्सवर भडकला अर्जुन कपूर… घेतला त्यांचा क्लास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे दोघेही लग्नाच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तसं तर अर्जुन कपूरला कूल मांईडेड म्हणून ओळखळे जाते. परंतु नकुताच हा कूल मांईडेड अर्जुन कपूर मलायकाचा रस्ता अडवल्याने फोटोग्राफर्सवर भडकला आहे. तसं पाहिल्या तर अशा घटना खूप कमी समोर आल्या आहेत ज्यात अर्जुन कपूर भडकल्याचे दिसत आहे. परंतु यावेळी मात्र संतापलेल्या अर्जुन कपूरने फोटोग्राफर्सचा चांगलाच समाचार घेतला.

मित्रांसोबत डिनर डेटसाठी गेलेल्या मलायका आणि अर्जुन कपूरचे फोटो घेण्यासाठी जेव्हा तिथे पोहोचले. त्यांनर आलेल्या फोटोग्राफर्सने मलायकाचे फोटो घेण्याच्या नादात नकळत तिचा रस्ता अडवला. हे पाहून कूल मांईडेड अर्जुन कपूर भलताच संतापला. अर्जुन कपूर फोटोग्राफर्सवर खवळला. त्याने त्यांचा चांगलाच क्लास घेतला.

मलायका आणि अर्जुन यांचे रिलेशन कोणाहीपासून लपून नाही. या दोघांना अनेकदा पार्टीज आणि हॉलिडेवर असताना एकत्र स्पॉट केले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अर्जुन कपूर त्याचा आगामी सिनेमा पानीपतमध्ये झळकणार आहे. आशुतोष गोवारिकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात अर्जुन कपूर व्यतिरीक्त संजय दत्त आणि कृती सेनन प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमात 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

मलायकादेखील नुकतीच तिच्या गर्ल गँगमुळे चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी मलायका, करीना, अमृता आणि तिचे आणखी काही मित्र हे सर्वजण टेरेसवर पार्टी करतानाचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळेही मलायका चांगलीच चर्चेत आली होती.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like