श्रीदेवीच्या निधनानंतर एका वर्षाने अर्जुन कपूरने केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर मलायका सोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत आहे. नुकत्याच त्यांच्या लग्नाच्या चर्चेने तर खूपच जोर धरल्याचे दिसत आहे. अशातच आता अर्जुन कपूर बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधानाशी संबंधित आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीचं निधन झालं होतं. आता श्रीदेवीच्या निधनानंतर एका वर्षानी अर्जुन कपूरने खुलासा केला आहे की, त्याने श्रीदेवीचा मृतदेह आणण्यासाठी बोनी कपूर यांच्यासोबत दुबईला जाण्याआधी घरातील एका सदस्यासोबत संवाद साधला होता.

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन कपूर म्हणाला की, “श्रीदेवीचा मृतदेह आणण्यासाठी बोनी कपूर सोबत दुबईला जाण्याआधी घरातील खास सदस्यासोबत संवाद साधला होता. श्रीदेवीच्या निधनाची मला अजिबात अपेक्षा नव्हती. मला समजत नव्हतं की, त्यावेळी मी नेमकं काय करू. अशा परिस्थितीत मी विचार करणं बंद केलं. मला काहीच कळत नव्हतं मग अशावेळी मी माझी मावशी अर्चना शौरी यांना कॉल केला. त्यानंतर त्यांच्या सोबत सर्व चर्चा केली. त्यांनीच मला सांगितलं की, तुला जे काही योग्य वाटत असेल ते कर. याशिवाय त्यावेळी मी अंशुलासोबतही बोललो होतो. आता अंशुला आणि मी जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा जान्हवी आणि खुशीच्या आनंदासाठी उभे राहू. मला याचा आनंद आहे की, मी जे काही केलं ते योग्य केलं. यासाठी मला कोणताही पस्तावाही वाटत नाही. तेव्हा जे काही घडत होतं ते तसा विचार मी माझ्या शत्रूंसाठीही करू शकत नाही.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर 24 मे रोजी अर्जुन कपूरचा आगामी सिनेमा इंडियाज मोस्ट वॉन्टेड रिलीज होणार आहे. या सिनेमाच फर्स्ट पोस्टर आणि टीजरही रिलीज झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like