अर्जुन तेंडुलकर बाबत ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला माहिती नसतील, नंबर 4 जाणून बसेल धक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय क्रिकेट टीममधून काही वर्षापूर्वी सन्यास घेणारा भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन सध्या आपल्या खेळाने प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. मागच्या वर्षी मुंबईत खेळल्या गेलेल्या टी 20 लीगमध्ये अर्जुन सर्वात महाग विकला जाणारा खेळाडू ठरला. अंडर 19 मधून अर्जुन जबरदस्त खेळला. अर्जुन तेंडुलकर डावखुरा गोलंदाज आहे. अर्जुनच्या जीवनाविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

1 – युवा क्रिकेटर अर्जुनचा जन्म 24 सप्टेंबर 1999 ला मुंबईच्या ब्रीचकँडी हॉस्पिटलमध्ये झाला. सचिन तेंडुलकरचा सुपुत्र असलेल्या अर्जुनची उंची 5 फूट 10 इंच (178 सेंटीमीटर) आहे. अर्जुनला एक बहिणसुद्धा आहे.

2 – युवा खेळाडू अर्जुन जेव्हा 8 वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील सचिन तेंडुलकर यांनी त्याला क्रिकेट कोचिंग क्लबमध्ये टाकले. अर्जुनचा फेव्हरेट क्रिकेटर त्याचे वडील सचिन तेंडुलकरच आहेत.

3 – अर्जुनला खरी ओळख नोव्हेंबर 2011 मध्ये मिळाली. 2011 मध्ये अर्जुनने जमनाबाई नार्सी स्कूलविरूद्ध धीरूभाई इन्टरनॅशनल पब्लिक स्कूलकडून 22 धावा करत 8 विकेट मिळवल्या होत्या.

4 – अर्जुन आणि महिला क्रिकेटर डॅनियलच्या अफेयरची जोरदार चर्चा मीडियात झाली. परंतु, ही अफवा होती. महिला खेळाडू डॅनियल अर्जुनपेक्षा वयाने खुप मोठी आहे. दोघे खुप चांगले मित्र आहेत. काही दिवसांपूर्वी महिला क्रिकेटर डॅनियलने युवा खेळाडू अर्जुनसोबतचा एक फोटो शेयर करताना लिहिले होते की, माझ्या मित्राला (अर्जुन) लॉर्ड्सच्या मैदानावर खेळाताना पाहून खुप चांगले वाटले. तो खुप वेगाने पुढे जात आहे.

5 – अर्जुनने आपल्या करियरचे पहिले शतक गोरेगावविरुद्ध अंडर 14 स्पर्धेत 2012 मध्ये जिमखानाकडून खेळताना केले.