अयोध्या प्रकरण : CBI च्या विशेष न्यायालयात साध्वी ऋतंभरा म्हणाल्या – ‘बाबरी विध्वंस प्रकरणात मी दोषी नाही’

लखनऊ : वृत्तसंस्था – राम मंदिर आंदोलनाच्या ज्येष्ठ नेत्या साध्वी ऋतंभरा यांनी सोमवारी दावा केल्या की, त्या बाबरी मशिद विध्वंस प्रकरात दोषी नव्हत्या. येथे एका विशेष सीबीआय न्यायालयात हजर झाल्यानंतर, साध्वी म्हणाल्या की, त्यावेळी एक राष्ट्रीय आंदोलन तयार झाले होते आणि लोक स्वत:ला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यास इच्छूक होते.

ज्यामुळे मशिदाचा विध्वंस झाला. नंतर, त्यांनी पत्रकारांना सांगितले की, हे प्रकरण न्यायालयात असल्याने मी जास्त माहिती देऊ शकत नाही. न्यायालयाने हे लक्षात घेतले पाहिजे की, सुप्रीम कोर्टाने अयोध्येत राम मंदिर निर्माणाचा रस्ता मोकळा केला आहे.

दरम्यान, बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपी असलेले जे नामवंत लोक, जे ज्येष्ठ नागरिक किंवा अस्वस्थ आहेत, त्यांना कोरोना महामारीमुळे प्रत्यक्ष न्यायालयात सादर होण्याची आवश्यकता नाही. न्यायालयाने अगोदरच सरकारला त्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करण्यास सांगितले आहे जे न्यायालयात येण्यास असमर्थ आहेत.