इम्यूनिटी बूस्टसह लठ्ठपणाही कमी करतो दालचिनी चहा, जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना काळात रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. यासाठी आयुर्वेदात अनेक पद्धती सांगितल्या आहेत. यापैकी एक आहे दालचिनी चहा. हा चहा कसा बनवावा आणि याच्या सेवनाचे कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात…

दालचिनी चहाची कृती –
एका भांड्यात पाण्यासह थोडी दालचिनी चांगली उकळवून घ्या. दालचिनी चांगली उकळल्यानंतर एका कपात पाणी गाळून घ्या. यामध्ये थोडे आले सुद्धा टाकू शकता. आवाडीनुसार मध किंवा लिंबू रस मिसळून पिऊ शकता.

दालचिनी चहा पिण्याचे फायदे –
– वजन घटते. शरीरचे मेटाबॉलिज्म वाढते. फॅट वेगाने बर्न होते.

– यातील पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडेंट्स तत्वामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहते, हृदयरोगांपासून बचाव होऊ शकतो.

– इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे शुगर लेव्हल कंट्रोल होते.

– पीरियड्स दरम्यान होणार्‍या वेदना आणि क्रॅम्प्सची समस्या दूर होऊ शकते.