Video : बाबा रामदेव यांनी शेअर केला व्हिडीओ, म्हणाले – ‘सुशांतच्या कुटुंबियांचं दुःख ऐकून अंगावर काटे आले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – योग गुरु बाबा रामदेव यांनी स्वतंत्रता दिवसाचे निमित्त साधून शनिवार, 15 ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये दिसत आहे, बाबा रामदेव बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी होम पूजा करत आहेत. त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर टाकला आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, ” मी सुशांतच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांचं दुःख ऐकलं आणि माझं अंतःकरण भरून आलं, आम्ही सगळेजण पतंजलीमध्ये सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना करत आहोत, सुशांत सिंह राजपूत आणि त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे.” सुशांत सिंहचा त्याच्या बहिणीसोबत मस्ती करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. मुंबईहून पंचकुला येथे सुशांत कारने गेला होता. सुशांत सिंह प्रकरण जरी सीबीआय कडे गेलं असलं तरी त्याच्याबद्दल रोज काहींना काही व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी असं म्हटलं जातं होतं की सुशांतचे त्याच्या बहिणीसोबत संबध चांगले नव्हते. पण बहिणीसोबत असलेल्या व्हिडिओवरून असं लक्षात येतं की सुशांतचे त्याच्या कुटुंबियांसोबत चांगले संबंध होते.

नेहमी हसतमुख असायचा सुशांत
सुशांत सिंह नेहमी हसत खेळत राहत होता. त्याला औषध घेण्याची देखील सवय नव्हती. तो स्वतःची कामे स्वतः करायचा. सुशांत जे खायचा तेच आपल्या कामगारांनाही खायला द्यायचा. ही गोष्ट त्याच्या ड्रायव्हरने सांगितली. त्याच्या ड्रायव्हरचं म्हणणं आहे की, ‘रिया जेव्हापासून सुशांतच्या आयुष्यात आली तेव्हापासून त्याचं आयुष्य बदलून गेलं. रियाच्या सांगण्यावरून सुशांतने त्याच्या जुन्या नोकरांना कामावरून काढलं. रियाने हे सगळं मुद्दाम केलं, आणि जाणीवपूर्वक तिच्या लोकांना सुशांतच्या जवळ आणलं.’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like