वाहन चालवण्यापुर्वी जाणून घ्या आजपासून लागू होणारे ‘हे’ नवीन नियम, अन्यथा होऊ शकतं तुमचं DL रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एक ऑक्टोबरपासून माहिती तंत्रज्ञान (आयटी) च्या मदतीने खासगी आणि व्यवसायिक चालकांची ऑनलाइन देखरेख करण्याची व्यवस्था लागू झाली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी, अधिकार्‍यांशी वाईट वर्तणूक, वाहन न थांबवणे, ट्रक केबिनमध्ये प्रवाशी बसवणे इत्यादी वागणुकीवर मोठा दंड आणि ड्रायव्हिंग लायसन्स (डीएल) निलंबित किंवा रद्द होऊ शकते.

सरकार पोर्टलवर याचा रेकॉर्ड ठेवणार आहे. यातून भविष्यात चालकांवर ऑनलाइन लक्ष ठेवता येईल. वाहतूक आता चालकाकडे कागदपत्र मागणार नाहीत. रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने नव्या नियमांची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार मोटर वाहन कायदा 1988 कलम 19, 21 प्रमाणे बस, टॅक्सीमध्ये जास्त प्रवाशी बसवणे, प्रवाशांसोबत वाईट वागणूम, स्टॉपवर त्यांना न उतरवणे, बस चालवताना धुम्रपान करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, विनाकारण वाहन हळू चालवणे, जास्त वेळाने ठिकाणावर पोहचणे, ट्रकच्या केबिनमध्ये आणि मागे प्रवाशी बसवणे, थांबवण्याचा इशारा केला तरी न थांबणे, बसमध्ये सिगारेट पिणे इत्यादी प्रकार चालकांना महागात पडणार आहेत.

यामध्ये वाहनात बसलेल्या प्रवाशाला खाली उतरून आंदोलन किंवा संप करणे आणि बुकिंगनंतर जाण्यास नकार देणारे कॅब चालक यांचाही समावेश असणार आहे. वाहतूक पोलिसांना, आरटीओला दंडाची रक्कम, कारवाई इत्यादीची माहिती पोर्टलवर नोंदवणे बंधनकार आहे. सोबतच पोर्टल रोज अपडेट करावे लागेल.

नव्या कायद्यात दंड केलेल्या ड्रायव्हरच्या वागणुकीचा उल्लेख करावा लागेल. उपद्रव, जनतेसाठी धोका निर्माण करणे, वाहनचोरी, प्रवाशांवर हल्ला, त्यांच्या सामनाची चोरी करणार्‍या चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like