‘ही’ आहे करीम लाला आणि इंदिरा गांधी यांच्या भेटीची खरी कहाणी, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांना भेटायच्या असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. यानंतर इंदिरा गांधी आणि लाला यांच्या भेटीचा एक फोटोही समोर आला आहे. यानंतर वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. हाजी मस्तान यांचा मानसपुत्र सुलेमान मिर्झा यानेही राऊतांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. परंतु लाला आणि इंदिरा गांधी यांची एकच भेट झाली आहे अशी माहिती मिळत आहे. तीही मुंबईत नाही तर दिल्लीत झाल्याचे समजते. ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर आणि राम पवार यांनी मुंबईत अशी कोणतीही झाली नाही असा दावा केला आहे.

दिल्लीतील इंदिरा गांधी आणि लाला यांच्या भेटीचा जो संदर्भ आहे तो लेखक, अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्या पद्मभूषण पुरस्कार समारंभातील आहे. ही घटना 1973 सालची आहे.

indira gandhi and lala

अभिनेते आणि कवी हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांना 1973 साली पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. यासाठी ते दिल्लीला जााणार होते. हरिंद्रनाथ आणि करीम लाला यांचे मैत्रीचे संबंध असल्याने ते करीम लालाला घेऊन दिल्लीला आले. त्यावेळी करीम लालाने राष्ट्रपती भवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. या पुरस्कार सोहळ्यासाठी देशातील अनेक प्रसिद्ध लोक आले होते. यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही समावेश होता.

या समारंभात लोक आपापसात चर्चा करत होते. तेव्हा करीमा लालाने इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत फोटोही काढला. पठाणांचा नेता म्हणून त्याने ओळख करून दिली होती. करीम लालाचे सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांशी चांगले संबंध होते. दिल्लीत इंदिरा गांधी आणि करीम लाला यांच्या या एकमेव भेटीव्यतिरीक्त या दोघांची इतर कोणतीही भेट झाल्याचे पुरावे मिळत नाहीत असं दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like