फेव्हीकॉलची नवी जाहिरात : राजस्थानच्या पांडे हाऊसमधील ‘तो’ सोफा, ‘ही’ त्याची स्टोरी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांगली जाहिरात सर्वात आधी लोकांचे आकर्षण तसेच लक्ष वेधून घेत असते. जाहिरात जितकी चांगली असते तितकीच ती लोकांच्या मनात घर करते. मात्र सध्या टीव्हीवर आणि सोशल मीडियावर एका जाहिरातीने धुमाकूळ घातला असून फेव्हीकॉलची हि जाहिरात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. या जाहिरातीत फेव्हीकॉलने आपल्या 60 वर्षांच्या इतिहासाची सफर घडवली आहे.
फेव्हीकॉलच्या जाहिराती नेहमीच लोकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आलेल्या आहेत. यावेळी देखील या जाहिरातीमधून याचे महत्व विशद करण्यात आले आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला या जाहिरातीला मोठ्या प्रमाणात ट्रोलदेखील केले जात आहे.

सोशल मीडियावर काही लोकांनी या जाहिरातीला जातीवाद म्हटले आहे तर काही जणांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काही जण यावर धुन चोरी केल्याचा आरोप करत आहेत. मात्र तरीदेखील हि जाहिरात मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फिरत आहे. या जाहिरातीत एक सोफा कशाप्रकारे प्रत्येक पिढीला कशाप्रकारे मजबूत राहिला आहे, हे दाखवले गेले आहे. 60 वर्षाच्या कालखंडात या सोफ्यामागील कहाणी दाखविण्यात आली आहे.

ही जाहिरात तयार करणाऱ्या फिल्ममेकर प्रसून पांडे यांनी यामागील संपूर्ण कथा सांगितली आहे. त्यांनी सांगितले कि, एक वर्षांपूर्वी Pidilite चेअरमन मधुकर पारीख आणि Pidilite चे एमडी यांच्यात एक मिनिटाची मिटिंग झाली होती. त्यामध्ये नवीन जाहिरातीची गरज असल्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार 7 महिन्यांनी दुसरी मिटिंग घेण्यात आली. त्यानंतर 10 मिनिटांची मिटिंग झाल्यानंतर एक जाहिरात त्यांना आवडली आणि त्यांनी हि जाहिरात करण्याचे ठरवले. मात्र फेव्हीकॉलच्या 60 वर्षांच्या प्रवासाला एका जाहिरातीत दाखवणे खूप अवघड होते. त्यानंतर 90 सेकंदाची एक स्क्रिप्ट तयार करण्यात आली. आणि त्या जाहिरातीला नाव दिले फेविकॉल सोफा. मात्र जितका साधा दिसत होता त्यापॆक्षा यावर जाहिरात करणे खूप अवघड होते. मात्र आम्ही त्यावर काम करून एक उत्तम जाहिरात तयार केली. यामध्ये जयपूरमधील पांडे हाऊसमधील एका सोफ्याचा वापर करण्यात आल्याची माहिती प्रसून जोशी यांनी दिली.

दरम्यान, हा सोफा 1946 मध्ये माझे वडील लखनऊ मधून घेऊन आले होते. त्यानंतर इंग्रजांनी देश सोडल्यानंतर दोन खुर्च्या आणि दोन साईड टेबल होते. त्यानंतर त्याच्या मदतीने हा सोफा तयार करण्यात आला. त्यानंतर या सोफ्याचे कापड बदलत राहिले मात्र हा सोफा काही बदलला गेला नाही, अशी यामागील कहाणी या जाहिरातीत सांगण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –