‘ठाकरे’ आडनाव आणि ‘इतिहास’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न अखेर पूर्ण होताना दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरेचे पुत्र आणि युवासेना प्रमुख यांच्या रुपाने पहिल्यांदा ठाकरे कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवली आणि ती जिंकली.

आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्या सोशल मीडियावर नजर टाकली तर त्यांच्या ठाकरे अडनावाचं स्पेलिंग थोडं वेगळंच दिसतं. आपण मराठीत ठाकरे असे जरी लिहित असलो तरी स्पेलिंगनुसार त्याचा उल्लेख ‘थॅकरे’ असा होते. ठाकरे कुटुंबीय त्यांच्या नावाचे स्पेलिंग ‘Thackeray’ असे लिहण्यामागे एक इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांनी आडनावात ‘Thackeray’ हा शब्द जोडला होता.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे आधीचे आडनाव ‘पनवेलकर’ असे होते. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पनवेल या ठिकाणी झाला. प्रबोधनकारांच्या आत्मकथेत म्हटलं आहे की, त्यांचे पुर्वज धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते. तेव्हा त्यांचे आडनाव धोडपकर होते. केशव ठाकरेंचे पणजोबा कृष्ण धोडपकर हे रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी राहत होते. प्रबोधनकारांचे आजोबा रामचंद्र धोडपकर हे पनवेलमध्ये राहिले तेव्हापासून पनवेलकर हे अडनाव त्यांनी लावले. प्रबोधनकार सुद्धा सुरुवातीला पनवेलकर असे आडनाव लावत होते. मात्र, नंतर त्यांनी स्वत: ठाकरे असे आडनाव केलं.

प्रबोधनकार ठाकरे हे भारतात जन्मलेल्या विल्यम मेकपीस थॅकरे यांचे चाहते होते. त्यांचीच प्रेरणा घेऊन नावापुढे Thackeray हा शब्द जोडला. विल्यम थॅकरे प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार होते. त्यांचा जन्म कोलकत्यात 1781 मध्ये झाला होता. त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीत सचिव होते. त्यांच्या कादंबऱ्यांवर अनेक मालिका आणि चित्रपट निघाले. केशव ठाकरे यांनी प्रबोधनकार या नावाने लेखन सुरु केल्यानंतर ते प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जाऊ लागले.

Visit : Policenama.com