सावधान ! WhatsApp वर आलेला ‘हा’ मेसेज तुम्हाला टाकू शकतो मोठ्या संकटात, रिकामे करू शकतो बँक खाते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   इंस्टंट मेसेजिंगसाठी व्हॉट्सअ‍ॅप सर्वात जास्त वापरले जाणारे अ‍ॅप आहे. याच कारणामुळे सायबर गुन्हेगार सुद्धा फ्रॉड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज वायरल होत आहे. या मेसेजमध्ये लिहिलेले आहे की, जर तुम्ही हा सर्वे फॉर्म भरला तर तुम्हाला अमेझॉनच्या 30 व्या उत्सावानिमित्त गिफ्ट देण्यात येत आहे. जर तुमच्याकडे असा मेसेज आला तर तुम्ही मोठ्या स्कॅममध्ये अडकू शकता. कारण हा मेसेज फेक आहे.

अशी घेतली जाते पर्सनल माहिती

या मेसेजमध्ये एक युआरएल दिला आहे ज्यावर क्लिक करून फ्री गिफ्ट जिंकण्याची संधी मिळेल. युआरएलवर क्लिक केल्यानंतर एक सर्वे पेज ओपन होईल. येथे यूजर्सला त्याची अनेक प्रकारची पर्सनल माहिती घेतली जाईल. यामध्ये यूजरचे वय, जेंडर आणि आणि तुम्ही कशाप्रकारे अमेझॉन सेवेला रेट करता, यासंबंधी माहिती घेतली जाते.

या सर्वेमध्ये एक गोष्ट अशी सुद्धा विचारली जाते की, यूजर अँड्रॉईड फोनचा वापर करतो की आयफोन. पेजमध्ये एक टायमर आहे जो यूजरला अर्जन्सी जाणवून देतो. यूजर घाईघाईत फसतो. एका पाठोपाठ एक या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर, यूजरला स्क्रीन काही गिफ्ट बॉक्सेस दाखवते ज्यावर क्लिक केल्यावर दिसेल की, तुम्ही हुआवेई मेट 40 प्रो स्मार्टफोन जिंकला आहे. परंतु हे गिफ्ट मिळवण्यासाठी तुम्हाला हे क्विज 5 व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये किंवा 20 व्यक्तिगत चॅटमध्ये शेयर करावे लागेल.

या फ्रॉड्सपासून असा करा बचाव

बहुतांश प्रकरणात, गिफ्ट कधीही कुणाला मिळत नाही. परंतु, यूजर्स ते मिळवण्यासाठी दुष्टचक्रात फसत जातो. या क्विजचा जो युआरएल दिसतो तो बनावट आहे. बहुतांश वापरकर्ते हे पाहण्या एवढे सतर्क नसतात. यासाठी, हे समजले पाहिजे की, कोणतीही मोठी कंपनी कधीही आपल्या कोणत्याही सर्व्हिसमधून संबंधित सर्वे करण्यासाठी कोणतेही गिफ्ट देत नाही. अशा घोटाळ्यांपासून वाचण्यासाठी युआरला काळजीपूर्वक पहाणे योग्य ठरते. तो स्कॅमरने मोठ्या कंपनीसारखा दिसण्यासाठी बनवलेला असतो, परंतु जेव्हा तुम्ही हा युआरएल लक्षपूर्वक पहाल तेव्हा यामध्ये काही जंक आणि अनवाँटेड कॅरेक्टर दिसतील.