Bharti Singh Arrested : ड्रग्स प्रकरणात 4 तासांच्या चौकशीनंतर अभिनेत्री भारती सिंहला अटक; पतीची चौकशी सुरूच !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडमधील ड्रग्स केसमध्ये कॉमेडीयन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) हिला अटक करण्यात आली आहे, तर तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) याची एनसीबीकडून अद्याप चौकशी सुरू आहे.

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) केसमध्ये ड्रग्ज अँगलचा तपास करणाऱ्या नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापेमारी केली आहै आणि त्यांचा पुढील तपास सुरूच आहे. अशात एनसीबीच्या टीमनं शनिवारी महिला कॉमेडीयन आणि टीव्ही अभिनेत्री भारती सिंह (Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया (Harsh Limbachiyaa) यांच्या मुंबईतील घरावर छापा मारला. अशी माहिती होती की, एनसीबीला भारतीच्या घरी गांजा मिळाला आहे. याशिवाय ही एजन्सी अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा भागात छापेमारी करत आहे. एनसीबीनं भारती सिंह आणि तिच्या पतीला समन्स बजावलं होतं. यानंतर आता भारती आपल्या पती हर्ष सोबत एनसीबीच्या कार्यालयात आली होती. दीर्घकाळ चौकशीनंतर तिला अटक झाली आहे.

एनसीबीनं दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये याची पुष्टी करण्यात आली आहे. एनसीबीनं यात सागितलं आहे की, भारती सिंह हिचं प्रॉडक्शन हाऊस घरावर छापेमारी केल्यानंतर यात 86.5 ग्रॅम गांजा मिळाला होता. भारती आणि हर्ष यांनी गांजा सेवन केल्याचं कबुल केलं आहे. भारतीला अटक झाली आहे, तर पतीची चौकशी सुरू आहे.

You might also like