जेव्हा भूमी पेडणेकरच्या एका कॉलनं बदललं ‘या’ अभिनेत्याचं आयुष्य, जाणून घ्या पूर्ण किस्सा !

पोलीसनामा ऑनलाइन टीम : बॉलिवूड स्टार अब अक्षय कुमार सोबत बेबी सिनेमात एक स्पाय (ट्रेटर)ची भूमिका साकारणारा अभिनेता करण आनंद यानं जीवनात खूप स्ट्रगल केला आहे. करणनं आजवर सलमान खान, गोविंदा, अक्षय कुमार अशा अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे. करणनं एक किस्सा सांगितला आहे की, कशा प्रकारे भूमी पेडणेकरच्या एका कॉलनं त्याचं आयुष्य बदललं होतं.

आपला सिनेमाचा प्रवास सांगताना करण म्हणाला, “एका नव्या अ‍ॅक्टरप्रमाणंच मलाही स्ट्रगल करावा लागला होता. इंडस्ट्री समजून घ्यायलाच मला 5 वर्षे लागली. कुठे जाऊ कोणाला भेटू काहीच कळत नव्हतं. माझा कोणीच गॉडफादर नव्हता. मी डायरेक्ट मुंबईला आलो होतो. मुंबईत आल्यानंतर मी लोकांना भेटत राहिलो. नंतर मला टीव्हीत काम मिळू लागलं. आश्चर्याच बाब अशी की, मला टेलीव्हिजनवरील माझा रोल बघून गुंडे सिनेमा मिळाला.”

करण सांगतो, “मी रोजच्यासारखंच जीममध्ये होतो. चुकून मी त्या दिवशी इअरफोन्स लावले होते. मला एक कॉल आला. त्या मुलीनं मला विचारलं की, दूरदर्शनवरील मालिकेत तुम्हीच विजय सिंहचा रोल करता का ? मी म्हणालो हो. माझं नाव करण आहे. यावर ती मुलगी म्हणाली, तुम्हाला एका सिनेमासाठी फायनल करण्यात आलं आहे. तुम्ही जर फ्री असाल तर ऑडिशनसाठी येऊ शकता का. मी विचारलं तुम्ही कोण बोलताय ?” करण म्हणतो, मी प्रश्न केल्यावर समोरून ती मुलगी म्हणाली मी यश राज फिल्म्स मधून बोलत आहे. तो कॉल होता भूमी पेडणेकरचा. पुढील दिवशी 8 वाजता मी यश राज स्टु़डिओत गेलो आणि ऑडिशन दिलं. 8 दिवसांनंतर मला कॉल आला की, मला सिनेमासाठी फायनल करण्यात आलं आहे. तिथून मी टीव्हीसोबतचं नातं तोडून सिनेमाच्या दुनियेत आलो.”