खूषशखबर ! ‘सोन्या-चांदी’च्या दरात ‘कमाली’ची घसरण, जाणून घ्या 10 ग्रामचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनलॉक भारतात खुप दिवसानंतर सराफा बाजार उघडल्यानंतर उत्साह दिसत आहे. लग्नाच्या सीझनमध्ये एक चांगली बातमी ही आहे की, आज 3 जून रोजी बुलियन मार्केटमध्ये सोने-चांदीच्या किमतीमध्ये मोठी घसरण दिसून आली. 18 कॅरेटपासून 24 कॅरेटपर्यंतचे सोने स्वस्त झाले आहे. तर चांदीसुद्धा 1320 रुपये प्रति किलोग्रॅम उतरली आहे. मागील तीन दिवसात सोने 617 रुपयांनी स्वस्त झाले आहे. 1 जून रोजी ते 47306 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने विकले गेले होते. इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइट याचे सरासरी दर अपडेट करते. त्यानुसार 3 जून 2020 ला सोने-चांदीचे दर अशाप्रकारे होते…

धातु 3 जूनचा दर (रुपये/10 ग्रॅम) 2 जूनचा दर (रुपये/10 ग्रॅम)
रेटमध्ये बदल (रुपये/10 ग्रॅम)

गोल्ड 999 46689 47075 -386
गोल्ड 995 46502 46887 -385
गोल्ड 916 42767 43121 -354
गोल्ड 750 35017 35306 -289
गोल्ड 585 27313 27539 -226

सिल्व्हर 999 48220 रुपये प्रति किलोग्रॅम 49540 रुपये प्रति किलोग्रॅम -1320 रुपये प्रति किलोग्रॅम

आज सकाळी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत 386 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण दिसून आली. या घसरणीसह सोने 46689 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. तर चांदीमध्ये 1320 रुपये प्रति किलोग्रॅम घसरण झाली आहे. यासोबतच चांदी आता 48220 रुपयांवर आली आहे.

10 ग्रॅम 24 कॅरेट सोने आज सकाळी 46689 रुपयांवर आले आहे. तर 23 कॅरेट सोने म्हणजे गोल्ड 995 मध्ये 385 रुपये कमी झाले आहेत. यासोबतच आता 23 कॅरेट सोन्याची किंमत 46502 रुपयांवर आली आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 354 रुपये घटून 42767 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आली आहे. यामध्ये जीएसटी लावलेला नाही.

कमजोर जागतिक संकेतांमुळे सोने वायदामध्ये घसरण

परदेशातील कमजोर स्थितीमुळे व्यापार्‍यांनी त्यांच्या सौद्यात कपात केली ज्यामुळे वायदा व्यवसायात बुधवारी सोन्याची किंमत 0.42 टक्के घसरणीसह 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. एमसीएक्समध्ये सोन्याचे जून महिन्यात डिलिव्हरीवाल्या कराराची किंमत 196 रुपये किंवा 0.42 टक्के घसरणीसह 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली, ज्यामध्ये 28 लॉटसाठी व्यवहार झाला.

सोने ऑगस्ट महिन्यात डिलिव्हरीवाल्या करारात किंमत 60 रुपये अथवा 0.13 टक्के घसरणीसह 46,498 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, ज्यामध्ये 15,044 लॉटसाठी व्यवहार झाला. न्यूयॉर्कमध्ये सोने 0.31 टक्के घसरणीसह 1,728.60 डॉलर प्रति औंस झाले.

चांदी वायदा किमतीत सुद्धा घसरण

कमजोर जागतिक संकेतांमुळे व्यापार्‍यांनी सौद्यांचे प्रमाण कमी केले, ज्यामुळे वायदा व्यवसायात बुधवारी चांदीची किंमत 71 रुपयांच्या घसरणीसह 49,009 रुपये प्रति किग्रॅ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये जुलै महिन्यात डिलिव्हरीवाल्या चांदीची किंमत 71 रुपये म्हणजे 0.14 टक्के घसरणीसह 49,009 रुपये प्रति किग्रॅ झाली. यामध्ये 12,128 लॉटसाठी व्यवसाय झाला.

अशाप्रकारे, चांदीच्या सप्टेंबर महिन्यातील डिलिव्हरीवाल्या कराराची किंमत 62 रुपये म्हणजे 0.12 टक्के घसरणीसह 49,797 रुपये प्रति किग्रॅ झाली. यामध्ये 944 लॉटसाठी व्यवसाय झाला. यादरम्यान न्यूयॉर्कच्या अंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 0.30 टक्के घसरणीसह 18.20 डॉलर प्रति औंस झाली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like