सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टवर मोठा खुलासा, वकिल म्हणाले – ‘लटकवलं की लटकून मृत्यू झाला हे नाही समजत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुशांत सिंह प्रकरण सध्या सीबीआय कडे तपासणीसाठी देण्यात आले आहे. पण या प्रकाणाचे रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुशांतच्या वडीलांचे वकील विकास सिंह यांनी एक चकित करणारा खुलासा दिला आहे. ते म्हणाले, कि सुशांतच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मृत्यूची वेळ नोंदवली नाही जी खूप महत्त्वाची असते. त्यावरूनच समजेल कि सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली. ते पुढे म्हणाले मुंबई पोलीस आणि कूपर हॉस्पिटल यांना याचं उत्तर द्यावं लागेल. सीबीआय ला देखील खोलवर जाऊन चौकशी करावी लागेल त्याशिवाय सत्य समोर येणं अवघड आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने पहिल्यांदा कोणाशी बोलली? जाणून घ्या
सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा यांच्यात 20 मिनिटे संवाद झाला होता. 14 जूनला ते एकमेकांशी बोलले होते. त्यानंतरही ते फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते. या नव्या खुलशानंतर हा प्रश्न उभा राहिला आहे की या दोघांमध्ये काय संवाद झाला होता. याआधी देखील समजलं होतं की सॅम्युअल रियासाठी खूप स्पेशल होता, त्याने सुशांतच्या खात्यातून पैसेही काढले होते. या खुलशानंतर आता सॅम्युअल देखील वादाच्या भोवऱ्यात अडकणार कि काय अशी शंका आहे. व्हाट्सआप वर देखील या दोघांचं अनेक वेळा बोलणं झालं होतं. त्यामुळे त्याचीही चौकशी होऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार सॅम्युअलकडे खूप सिम कार्ड्स आहेत ज्याची चौकशी सुरु आहे.

फ्लॅटच्या ईएमआय शी संबंधित अंकिताचा खुलासा
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार असं समजतंय कि सुशांत अंकितापासून लांब गेल्यानंतरही
सुशांत अंकिताच्या फ्लॅटचे कर्ज फेडत होता. अनेक महिने तो ईएमआय देत होता. या गोष्टीवरून वाद झाल्यानंतर आता अंकिता स्वतः समोर आली आहे. तिने याबद्दलची विस्तृत माहिती सांगत स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अंकिताने ट्विटरवर तिच्या फ्लॅटचा मालकी हक्क, कर्ज आणि ईएमआय अशी सगळी माहिती टाकली आहे. तिने काही कागदपत्रांचे फोटो देखील शेअर केले आहेत. 1 जानेवारी 2019 ते 1 मार्च 2020 पर्यंतची बँकेची माहिती तिने दाखवली केली आहे.

सुशांतच्या आठवणीने भावुक झाली अंकिता
14 ऑगस्ट ला सुशांतच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाली. अंकिताने ट्विट करत लिहिलं, “दोन महिने झाले सुशांत आणि मला माहित आहे की तू जिथे कुठे आहेस तिथे खुश असशील. 15 ऑगस्ट रोजी 10 वाजता होणाऱ्या ग्लोबल प्रेअर मध्ये सर्वांनी सहभागी व्हा”. अंकिताने ट्विटर वर एक फोटो शेअर करत लिहिलं, “सुशांतसिंह राजपूतसाठी 24 तासांची एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली आहे, सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा जेणेकरून सत्य टिकून राहील आणि सुशांतला न्याय मिळेल.” तिने आपला फोटो शेअर करत लिहिलं आहे, ‘हात जोडून आपला फोटो शेअर करा आणि सुशांतच्या ग्लोबल प्रेयर मध्ये सहभागी व्हा.’