11 वर्षानंतर बजेटच्या दिवशी 5 टक्क्यांनी वाढ होऊन सेंसेक्स बंद; जाणून घ्या कोणत्या घोषणांमुळे शेअर बाजाराला मिळाला ‘बूस्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑटो आणि बँकिंग सेक्टरसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण घोषणांमुळे 11 वर्षानंतर पहिल्यांदा बजेटच्या दिवशी सेंसेक्स 2300 वर जाऊन बंद झाला. आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी फोकस बजेटचे शेअर बाजारात मोठे स्वागत केले. आज सेंसेक्स 48,764.40 च्या स्तरावर पोहोचला होता. मात्र, अखेरीस 2314.84 म्हणजेच 5 टक्क्यांनी वाढून 48,600.61 अंकावर बंद झाला. एनएसईचा निफ्टीही 646.60 अंक म्हणजे 4.74 टक्क्यांनी वाढून 14,281.20 अंकांवर जाऊन बंद झाला.

5 टक्क्यांनी वाढून सेंसेक्स बंद
11 वर्षांत पहिल्यांदाच बजेटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी पाहिला मिळत आहे. मागील 10 वर्षांत प्रणव मुखर्जी यांच्यापासून निर्मला सीतारमन यांच्यापर्यंत अर्थमंत्री जे काही सांगेल ते होत आहे. बजेटच्या दिवशी शेअर बाजाराची स्थिती ठिक राहिली नाही. बजेटच्या दिवशी 10 वर्षांत फक्त तीनवेळा सेंसेक्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहिला मिळाले.

बँकिंग आणि ऑटो शेअरमध्ये तेजी
सेंसेक्सच्या कंपन्यांमध्ये इंड्सइंड बँक सर्वाधिक 14 टक्क्यांपेक्षा अधिक फायद्यात राहिली. आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व्ह, भारतीय स्टेट बँक, L & T आणि एचडीएफसी शेअरमध्ये तेजी झाली.

मागील दोन बजेटमध्ये बाजार कोसळला
सीतारमन यांनी मांडलेल्या त्यांच्या कार्यकाळातील दोन्ही वेळा बाजार कोसळला. अंतरिम बजेटवेळी 5 जुलै, 2019 ला सेंसेक्स 395 अंकांनी गेला तर 1 फेब्रुवारी 2020 ला सर्वसाधारण बजेटच्या दिवशी 900 अंकांनी कमी झाला होता.

बजेटच्या घोषणेनंतर बँकिंग सेक्टरमध्ये तेजी
दोन राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणामुळे सकारात्मक बदल दिसतील. तसेच बजेटच्या घोषणेनंतर बँकिंग सेक्टरमध्ये तेजी आली.