Corona संकटकाळात खरेदी करा ‘हे’ 5 स्मार्टफोन, 10000 पेक्षाही कमी किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दररोज विविध कंपन्या आपले स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. पण तरीही सर्व नवीन वैशिष्ट्यांसह येणारा आवडता बजेट स्मार्टफोन लोकांना मिळत नाही. बाजारात इतकी स्पर्धा आहे की, दररोज नवनवीन स्मार्टफोन येत आहेत, पण कोणता स्मार्टफोन खरेदी करायचा हे समजत नाही. तर आज आपण अशा पाच स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, जे १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे आहेत आणि जे सर्व नवीन वैशिष्ट्यांसह येतात.

रिअल मी ३
रिअल मी ३ मध्ये ६.२ इंचाचा HD+ ड्यू ड्रॉप डिस्प्ले आहे, जो MediaTek Helio P70 प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये ड्युअल बॅक कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सेल कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. या फोनमध्ये ४,२३० एमएएच लॉन्ग लास्टिंग बॅटरी देखील दिली गेली आहे. रियल मी ३ ची प्रारंभिक किंमत ८,९९९ रुपये आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी ए १०
फोनचे व्हेरिएंट २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येते. मायक्रो एसडीकार्डद्वारे फोनचे स्टोरेज ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये ६.२ इंचाचा InFinity-V डिस्प्ले आहे. फोनमध्ये ३,४०० एमएएच बॅटरी आहे आणि फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फ्लिपकार्डवरून तो फक्त ७,९९० रुपयांमध्ये काळ्या आणि निळ्या रंगात खरेदी करता येईल.

सॅमसंग गॅलॅक्सी एम १०
या फोनमध्ये ६.२ इंचाचा HD+ इन्फिनिटी-व्ही डिस्प्ले आहे. फोनमध्ये Exynos 7870 प्रोसेसर आहे. फोन २ जीबी रॅम + १६ जीबी स्टोरेज आणि ३ जीबी रॅम + ३ जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. मायक्रो एसडीकार्डद्वारे फोनचे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. फोनच्या २ जीबी व्हेरिएंटची किंमत ६,९९९ रुपये आहे आणि ३ जीबी व्हेरिएंटची किंमत ८,६९० रुपये आहे.

रेडमी ६ प्रो
स्मार्टफोन निर्माता शाओमीच्या रेडमी ६ प्रो मध्ये ५.८४ इंचाचा आयपीसी एलसीडी डिस्प्ले आहे. स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ६२५ प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये १२ आणि ५ मेगापिक्सलचे रियर कॅमेरे आहेत. या फोनमध्ये सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ४,००० एमएएच बॅटरी आहे. फोनच्या ३ जीबी रॅम + ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत ९,९९९ रुपये आहे.

रेडमी नोट ७
रेडमी नोट ७ मध्ये ६.३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. फोनच्या दोन बाजूंनी गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम ६६० प्रोसेसरवर चालतो. फोन ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनचे स्टोरेज २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोनमध्ये ४,००० एमएएच बॅटरी आहे. फोनमध्ये दोन रियर बॅक कॅमेरे आहेत, ज्यात १२ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल कॅमेरे आहेत. फोनमध्ये सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. ३ जीबी व्हेरिएंट फोन ८,९९९ रुपयांमध्ये ऍमेझॉनवरून खरेदी करता येईल.