’कोरोना’ लॉकडाऊनमुळं कर्तव्यावर हजर राहु न शकलेल्या जवानांना मोठा दिलासा, मिळणार स्पेशल CL

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला लगाम लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्चच्या अखेरीस देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली होती. लोकांना आवाहन करण्यात आले होते की, जे जेथे आहे, तेथेच राहावे. या कारणामुळे सुट्टीवर घरी गेलेले लष्करी जवान सुद्धा आपआपल्या युनिटमध्ये परतू शकले नव्हते. डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्सने अशा जवानांची सुट्टी नियमित केली आहे.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ मिलिट्री अफेअर्सने एका पत्रात म्हटले आहे की, लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचारी विशेष प्रासंगिक रजेवर भारत सरकार किंवा सेवा मुख्यालयाच्या आदेशामुळे लॉकडाऊनच्या कारणामुळे अनुपस्थित राहिल्याच्या कालावधीला नियमित करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीची माहिती देण्याचे निर्देश आहेत. हे पत्र तीन सेनादलाच्या प्रमुखांना सोमवारी जारी करण्यात आले.

पत्रात म्हटले आहे की, जवानांना त्यांच्या पदानुसार देण्यात आलेल्या सर्वात वेगवान वाहतुकीच्या माध्यमांचा उपयोग करण्याची परवानगी देण्यात येत आहे, जेणेकरून लॉकडाऊन हटवल्यानंतर लवकरात लवकर ते आपल्या युनिटमध्ये परतू शकतील. घरी गेलेल्या जवानांना लॉकडाऊनमुळे विभागाने सुट्टीवर राहण्यास सांगितले होते. या कालावधी दरम्यान काही सैनिकांच्या सुट्टीची संख्या एकुण असलेल्या सुट्ट्यांपेक्षा जास्त झाली. सुट्टी नियमित करत डीएमने स्पष्ट केले की, स्पेशल सीएलमुळे सैनिकांच्या एकुण असलेल्या सुट्यांवर कोणताही फरक पडणार नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like