दुचाकी आणि स्कूटीवर मागच्या सीटवर कोणाला बसवलं तर ‘पावती’ फाटणार, नवा नियम लागू

लखनऊ :  पोलीसनामा ऑनलाइन  –  बाईक किंवा स्कूटीवर केवळ चालवणाराच बसू शकतो. मागच्या सीटवर कुणी आढळल्यास प्रथम 250 ते 1000 रूपये दंड आकारण्यात येईल, त्यानंतर चालकाचा परवाना निलंबित केला जाऊ शकतो. मास्क घालणे, लॉकडाऊनचे उल्लंघन करणे आणि दुचाकी वाहनावर एकालाच परवानगी, या संबंधीची अधिसूचना महामारी नियंत्रण अ‍ॅक्ट अंतर्गत जारी करण्यात आली आहे. ही माहिती आरोग्य विभागाचे प्रमुख सचिव अमित मोहन प्रसाद यांनी मुख्य सचिव गृह व सूचना अवनीश अवस्थी यांच्यासोबत एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

प्रमुख सचिवांनी सांगितले की, महामारी नियंत्रण अ‍ॅक्टअंतर्गत जारी अधिसूचनेत चालक एकटा दुचाकी वाहन चालवू शकतो. मागे कुणालाही बसवण्याची परवानगी नाही. दुचाकी वाहनावर मागे बसल्याचे कुणी आढळल्यास प्रथम 250 रुपये, दुसर्‍या वेळेस 500 रुपये, तिसर्‍या वेळेस 1000 रुपये आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा निलंबित केले जाऊ शकते.

दुचाकी वाहनाच्या बाबतीत अपवाद म्हणून महिलांना एक सूट देण्यात आली आहे. जर महिलेला दुचाकी चालवता येत नसेल, आणि ती आपल्या घरच्या सदस्यासह कामावर जात असेल तर तिला सूट आहे. मात्र, यासाठी कार्यकारी दंडाधिकार्‍यांची परवानगी आवश्यक असणार आहे. मागे बसलेल्या महिलेसाठी हेल्मेट, मास्क आणि ग्लोव्हज बंधनकार आहेत.

आरोग्य विभागाच्या प्रमुख सचिवांनी सांगितले की, ज्याप्रमाणे चेहरा झाकल्याने दंड आहे, त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी थूंकण्यावरही दंड आकारण्यात येणार आहे. पहिल्या व दुसर्‍यावेळी पकडले गेल्यास 100 – 100 रुपये, तिसर्‍यावेळी पकडल्यास आणि त्यापेक्षा जास्त वेळेस पकडल्यास 500 – 500 रुपये दंड द्यावा लागणार आहे. या सर्व प्रकरणात दंड वसूल करण्याचा अधिकार कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलीस निरीक्षक यांना असणार आहे.