चंद्रग्रहण असणार 4 तासच, गर्भवती महिलांनी ‘या’ 5 गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 10 जानेवारी शुक्रवारी पहिले चंद्रग्रहण सुरु होईल. ते 10 जानेवारी रात्री 10.37 मिनिटांपर्यंत सुरु होऊन दुसऱ्या दिवशी 2.42 वाजता सकाळी संपेल. म्हणजेच पहिले चंद्रग्रहण जवळपास 4 तास 5 मिनिट सुरु राहिलं. हिंदु धर्मानुसार ग्रहणाचे व्यक्तीवर बरे-वाईट परिणाम होतात. ज्यापासून वाचण्यासाठी ज्योतिषीचे अनेक उपाय आहेत. परंतु उपछाया चंद्रग्रहणाला शास्त्रानुसार ग्रहणाच्या रुपात पाहिले जात नाही. या ग्रहणाचे सूतक नसते ज्यामुळे या काळात पूजा पाठ केला जाऊ शकतो.

ज्योतिषीनुसार या चंद्रग्रहणनाचा कोणताही परिणाम होत नाही. 2020 च्या आधी असे चंद्रग्रहण 11 फेब्रुवारी 2017 साली पाहिले गेले होते. ग्रहणासंबंधित गर्भवती महिलांसाठी काही नियम सांगितले जातात. ज्याचे पालन केल्याने जन्म घेणारे बाळ स्वस्थपूर्ण जन्म घेते.

1. टोकदार वस्तू –
ग्रहणाच्या दरम्यान गर्भवती महिलांनी टोकदार वस्तू जसे की सुरी, कात्री, सुई अशा वस्तूंचा वापर करणे टाळले पाहिजे. या नियमाचे पालन न केल्याने बाळाला हानी पोहचू शकते.

2. बाहेर न जाणं –
चंद्र ग्रहणाच्या दरम्यान गर्भवती महिलांनी घरााबाहेर पडू नये. असे म्हणले जाते की गर्भवती महिला जर ग्रहण पाहतात तर त्याचा थेट परिणाम महिलेच्या गर्भातील बाळावर होतो.त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाच्या अंगावर लाल दाग दिसतात. जन्मानंतर बाळाच्या अंगावर कोणता ना कोणता दाग राहतो.

3. ग्रहणादरम्यान बनवण्यात आलेले अन्न सेवन करणे टाळा –
गर्भवती महिलांनी ग्रहणादरम्यान तयार करण्यात आलेले अन्न सेवन करणे टाळावे. ग्रहणाची हानिकारक किरणं अन्नाला दुषित करतात. घरात अन्न बनवले असेल तर तुळशी पत्र टाका. ग्रहण संपल्यावर हे अन्न खा. असे केल्याने ग्रहणानंतर अन्न शुद्ध होते.

4. ग्रहणानंतर स्नान करणे आवश्यक –
मान्यता आहे की ग्रहण संपल्यावर गर्भवती महिलेने स्नान करावे. त्यामुळे बाळाला त्वचेचे विकार होत नाहीत. तसेच गर्भवती महिलेने ग्रहणादरम्यान तुळशी पत्र जीभेवर ठेवून हनुमान चाळीसा आणि दुर्गा स्तुतीचे पठन करावे.

5. शारीरिक संबंध नको –
ग्रहण काळात पती पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये. याशिवाय ग्रहणादरम्यान झोपण्यापूर्वी कोणत्याही औषधाचे सेवन करणे आणि देवाच्या मूर्तीला स्पर्श करणे टाळा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/