COVID-19 : देशातील ‘कोरोना’ रुग्णांच्या मृत्यूचा बदलतोय ‘ट्रेंड’, जाणून घ्या काय सांगतायेत ‘रिपोर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दरम्यान कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा ट्रेंड बदलत आहे. विषाणूमुळे आपला जीव गमावलेल्यांमध्ये आजारी आणि वृद्धापेक्षा धडधाकट आणि 60 वर्षांखालील लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स प्रोग्राम (आयडीएसपी) या संस्थेने अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे.

21 मे रोजी संस्थेच्या पहिल्या अहवालानुसार मृतांपैकी दोन तृतियांशाहून अधिक वृद्ध आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांनी ग्रस्त रूग्ण होते, तर 2 जुलै रोजी करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मृतांपैकी 43 टक्के लोकांना पूर्वीचा आजार नसल्याचे दिसून आले आहे. आणि 50 टक्के पेक्षा जास्त 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. आयडीएसपीने 2 जुलै पर्यंत 15962 मृृत्यूंचा, तपशीलाचा अभ्यास केेला,त्यावेळी जवळपास 18,000 मृत्यूंचे निदान झाले होते.

मंत्रालयाचे निवेदन
या अहवाला दरम्यान आरोग्य मंत्रालयाने देखील शनिवारी कोरोनाच्या मृत्यूच्या कारणाबाबत प्रतिक्रिया दिली. मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात कोरोनाचे 70 टक्के मृत्यू हे पूर्वीच्या आजारांमुळे होतात. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदय रोग, कर्करोग आणि श्वसन रोग असलेल्या कोविड रूग्णांना मृत्यूचा धोका जास्त असतो.

पहिल्यांदा 21 मे नुसार
मृतांपैकी 73 टक्के लोकांना पूर्वी कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले होते.
(एकूण 3435 मृत्यूच्या तपशीलाचा अभ्यास)

आता (2 जुलै)
मृतांपैकी 57 टक्के लोकांना आधीच आजारी होते
(15962 मृत्यूच्या तपशीलाचा अभ्यास)

धोकादायक सिग्नल
43 टक्के (6919) अश्या लोकांचा मृत्यू झाला ज्यांना आधी कोणताही आजार नव्हता. मृत्यूंपैकी 47 टक्के हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे कोरोना संक्रमित

मृत्यूंपैकी 47 टक्के हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे कोरोना संक्रमित
14 वर्षाखालील – 0.54%
15 ते 29 वर्षे – 2.64%
30 ते 44 वर्षे -10.82%
45 ते 59 वर्षे – 32.79%
60 ते 74 वर्षे – 39.02%
75 वर्षांपेक्षा जास्त -12.88%

इतर देशांमध्येही वाढतोय धोका 
अमेरिकेत मृतांपैकी 44 टक्के लोक 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहे. ब्राझीलमध्ये 60 वर्षांखालील 39 टक्के लोक मरण पावले आहेत

पुरुषांना जास्त धोका
देशात कोरोनामुळे 68 टक्के पुरुष आणि 32 टक्के महिलांचा मृत्यू झाला, संक्रमित स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये मृत्यूचा धोका 2.4 पट जास्त आहे.