जिच्या आयुष्यावर दीपिकाचा ‘छपाक’ बनला ! ती लक्ष्मी अग्रवाल कोण ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा छपाक हा सिनेमा 10 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिका अ‍ॅसिड अ‍ॅटॅक पीडितची भूमिका साकारत आहे. लक्ष्मी अग्रावाल हिच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा आहे. 2005 साली तिच्यावर नदीम खान नावाच्या व्यक्तीने अ‍ॅसिड फेकलं होतं.

मध्यम वर्गीय कुटुंबातील लक्ष्मीला सिंगर व्हायचं होतं. परंतु 32 वर्षीय नदीमला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. लक्ष्मीने लग्नाला नकार दिल्याने नदीमने हे कृत्य केलं होतं. 2005 मध्ये लक्ष्मी दिल्लीतल्या खान मार्केटमधील एका पुस्तकाच्या दुकानात होती. यावेळी नदीमने तिच्यावर अ‍ॅसिड फेकलं. चेहऱ्यावर अॅसिड पडल्यानंतर लक्ष्मी रस्त्यावर पडली. यानंतर एका टॅक्सी ड्रायव्हरने तिला जवळच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं.

लक्ष्मीने एका मुलाखतीत बोलताना सांगितले की, “मला असं वाटत होतं की, माझ्या पूर्ण शरीराला आग लागली आहे. चेहऱ्याची त्वचा निघून माझ्या हातात येत होती. मला अनेक सर्जरी कराव्या लागल्या. दोन महिने मी रुग्णालयातच होते. मी जिथे होते तिथे आरसा नव्हता. रोज सकाळी नर्स एका कटोऱ्यात पाणी आणायची त्यातच मी चेहरा पाहण्याचा प्रयत्न करायचे. मला फक्त माझ्या चेहऱ्यावर पट्टी दिसत होती. जेव्हा मी माझा चेहरा पाहिला तेव्हा माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते.”

यानंतर 2006 साली लक्ष्मीने अ‍ॅसिड विक्रीवर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली. यानंतर 2013 साली कोर्टाने अ‍ॅसिड विक्रीवर बंद आणली. याचवर्षी ती आलोक दीक्षित आणि आशिष शुक्ला यांच्या स्टॉप अ‍ॅसिड अ‍ॅटॅकच्या कॅम्पेनशी जोडली गेली.

अ‍ॅसिड अ‍ॅटॅक पीडितांची आवाज बनणाऱ्या लक्ष्मीचा इंटरनॅशनल वुमेन ऑफ करेज अवॉर्डने सन्मान झाला. या कॅम्पेन दरम्यान लक्ष्मी आलोक दीक्षितच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्न नाही केलं परंतु ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. एका मुलाखतीत लक्ष्मी म्हणाली, “आम्ही लग्न न करत समाजाला आव्हान देत आहोत. मला नाही वाटत की, लोकांनी आमच्या लग्नात यावं आणि माझ्या लुकवर कमेंट करावी.”

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !