‘ड्रॅगन’ला हवंय युध्द ? लडाखमध्ये LAC वर आता देखील चीन वाढवतोय सैनिक आणि शस्त्रे, भारत देखील उत्तर देण्यास ‘रेडी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   चलाक चीन आपली चाल बदलण्यास तयार नाही. ड्रॅगन एकीकडे मागे सरकण्याचे अश्वासन देत आहे आणि दुसरीकडे सैनिक वाढवून युद्धासारखी तयारी करत आहे. फिंगर एरियासह संपूर्ण लाईन ऑफ अ‍ॅक्चुअल कंट्रोल (एलएसी) वर चीन सैन्य आणि शस्त्र वाढवत आहे. ज्या पोस्टवरून 15 जूनला चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये युद्धसदृश्य हिंसक संघर्ष झाला होता, ती पोस्ट चीनने पुन्हा उभारली आहे. ही पोस्ट भारतीय सैनिकांनी उखडून टाकली होती, त्यानंतर भारताचे 20 जवान शहीद झाले होते.

लडाखच्या फिंगर परिसरात चीनी सैनिक आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारताने सुद्धा आपली येथे ताकद वाढवली आहे. चीनी सैन्याने पूर्व लडाखमध्ये 4 मेनंतर संख्या वाढवण्यास सुरू केली होती आणि 10 हजारपेक्षा जास्त सैनिक, तोफा, शस्त्र आणि सामान जमवले आहे. सूत्रांचा संदर्भ देऊन एएनआयने म्हटले आहे की, पँगोंग त्सो सरोवरासह फिंगर परिसरात चीन लागोपाठ सैन्य हालचाली वाढवत आहे. ते सैनिकांची संख्या वाढवत आहेत आणि कन्स्ट्रक्शनमध्ये गुंतले आहेत.

फिंगर 4 पासून पुढे करत आहे विरोध

भारताचा परिसर फिंगर 8 पर्यंत आहे, परंतु चीनी लष्कर सध्याच्या वादानंतर भारतीय सैनिकांना फिंगर 4 च्या पुढे जाण्यास रोखत आहे. चीन आक्रमक पद्धतीने नव्या परिसरावर दावा करत फिंगर एरिया आपल्या नियंत्रणात घेण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांनी सांगितले की, गलवान नदीच्या परिसरात जेथे 15 जूनच्या रात्री हिंसक मारहाण झाली होती, तेथे चीनी सैनिकांनी पुन्हा काही स्ट्रक्चर तयार केले आहे.

पेट्रोलिंग पॉईंट 14 च्या जवळ पुन्हा बांधकाम?

पेट्रोलिंग पॉईंटच्या जवळ 15-16 जूनच्या रात्री युद्धसदृश्य हिंसक हाणामारीत जी टेहाळणी पोस्ट भारतीय सैनिकांनी उखडून टाकली होती, ती चीनी सैन्याने पुन्हा बांधली आहे. पीपी-15, पीपी-17 आणि पीपी17-ए वर भारतीय सैनिक आहेत. दौलत बेग ओल्डी सेक्टरच्या मागे चायनीज पीपी-10 आणि पीपी-13 वर भारतीय सैनिकांची पट्रोलिंग रोखण्याच प्रयत्न चीनी सैनिक करत आहेत.

लढाऊ विमान आणि एयर डिफेन्स सिस्टम तैनात

चीनने होटन आणि गर गुन्सा परिसरात आपल्या एयरबेसवर मोठ्या संख्येने लढाऊ विमाने तैनात केली आहे, ज्यामध्ये रशिया निर्मित एसयू-30 सुद्धा आहेत. सिक्युरिटी एजन्सींनी सांगितले की, चीनने रशियाकडून घेतलेली लाँग रेंज एयर डिफेन्स सिस्टमसुद्धा तैनात केली आहे.

भारत सुद्धा तयार

बुधवारी पुन्हा एकदा आकाशात भारतीय लढावू विमाने गर्जत होती. तर जमीनीवर आपले सैनिक शत्रूच्या प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास तयार आहेत. न्यूज एजन्सी एएफपीने वृत्त दिले आहे की, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असली तरी जमीनीवरील स्थिती बदललेली नाही. गलवान खोर्‍यात चीनी सैनिकांच्या उपस्थितीत बुधवारी भारताने सुद्धा ताकद दाखवली आणि लढाऊ विमाने पर्वतांवर घिरट्या घालत होती. सीमेवर चीनी सैनिक वाढल्यानंतर भारताने सुद्धा सैनिक आणि शस्त्र येथे वाढवले आहे.

’अभूतपूर्व मिलिट्री मुव्हमेंट’

भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडच्या एका अधिकार्‍याने ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, या परिसरात आता आमची उपस्थिती आहे. लेहयेथील रहिवाशी आणि लष्कराचे रिटायर्ड कॅप्टन ताशी छेपल यांनी सांगितले की, पाकिस्तान आणि चीन लगतच्या परिसरात लष्कराची मुव्हमेंट अभूतपूर्व आहे. मी यापूर्वी कधीही अशा प्रकारची मिलिट्री मुव्हमेंट पाहिली नव्हती.