एक तासाच्या फ्लाइटने जगातील कोणत्याही देशाचा प्रवास, जाणून घ्या कोणत्या टेक्नॉलॉजीवर काम करतोय चीन

नवी दिल्ली : 350 किलोमीटर प्रति तासपर्यंतच्या स्पीडने बुलेट ट्रेन पळवणारा चीन आता एक अशी टेक्नॉलॉजी विकसित करत आहे, ज्याद्वारे तासाभरात जगातील कोणत्याही कोपर्‍यात पोहचता येईल. चीनी शास्त्रज्ञ स्पेस टेक्नॉलॉजीद्वारे यास यशस्वी करण्याबाबत विचार करत आहेत. चीनच्या एका मोठ्या शास्त्रज्ञाने यासाठी 2045 चे ध्येय ठरवून म्हटले की, हे विमान उड्डाणासारखे सामान्य असेल.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, चायना एयरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन (सीएएससी) च्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनचे डायरेक्टर बाओ वेइमिन यांनी 2020 चायना स्पेस कॉन्फरंस दरम्यान हे विचार मांडले. ही कॉन्फरंस पूर्व चीनच्या फुजिआन प्रांतात राजधानी फुझोऊमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

बाओ म्हणाले, हे ध्येय गाठण्यासाठी तीन डेव्हलपमेंटची गरज असेल. 2025च्या पूर्वी महत्वाच्या टेक्नॉलॉजीचा विकास करावा लागेल. 2035 पर्यंत स्पेस ट्रॅव्हलसारख्या एयरलायनरचा स्केल इतका मोठा असेल की हजारों प्रवासी आणि हजारो किलो सामानाची वाहतूक केली जाईल.

चीनी शास्त्रज्ञ बाओ यांनी सांगितले की, 2045 पर्यंत स्पेस ट्रॅव्हलसाठी एक संपूर्ण सिस्टम तयार होईल. प्रत्येक वर्षी हजारो विमाने उडतील, ज्यामधून लाखो लोक प्रवास करतील. हे महत्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी हायपरसोनिक फ्लाईंग टेक्नॉलॉजी आाणि पुन्हा वापरण्यात येणार्‍या रॉकेट कॅरियर टेक्नॉलॉजीची आवश्यकता असेल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like