मोठा खुलासा ! चिन्मयानंदचे ‘ते’ अश्लील व्हिडिओ विकत घेणार होते 2 नेता, जाणून घ्या काय होतं प्लॅनिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बलात्कार प्रकरणातील आरोपी स्वामी चिन्मयानंद यांच्या विषयी आणखी एक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संबंधित व्यक्ती संजय याच्याकडून व्हायरल झालेला व्हिडीओ खरेदी करण्यासाठी दोन नेते इच्छुक होते अशी माहिती समोर येत आहे. मात्र ते दोन नेते संजय यांचे नातेवाईक असले तरीदेखील त्यांच्यावर त्यांना विश्वास नव्हता. मात्र त्यानंतर लालच वाढल्याने त्याने तो व्हिडीओ शेवटी विकला नाही. मात्र त्यानंतर त्याला या प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या तो तुरुंगात आहे.

एप्रिल 2019 मध्ये चिन्मयानंद यांच्या मदतनीसांनी हा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली होती. काही व्हिडीओ संजय याला देखील मिळाले होते. यासंदर्भात त्याने आपला चुलत भाऊ विक्रम सिंह उर्फ दुर्गेश सिंह याच्याशी देखील चर्चा केली होती. त्यामुळे हे व्हिडीओ चिन्मयानंद यांना दाखवून मोठी रक्कम उकळण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र हि रक्कम ठरत नव्हती. त्यानंतर हे व्हिडीओ गावातीलच नातेवाईक आणि नेत्याकडे पोहोचला. त्यानंतर हा व्हिडीओ मिळवण्यासाठी या नेत्याने प्रयत्न सुरु केले. त्यानंतर विक्रमच्या मध्यस्थीने या दोघा नेत्यांनी संजय याच्याकडे हे व्हिडीओ विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. संजय याला या व्हिडिओच्या बदल्यात हवे तितके पैसे देण्यास देखील दोन्ही नेते तयार होते. मात्र संजय याने यासाठी नकार दिला.

दरम्यान, एसआयटी यासंदर्भात तपास करत असून संजय याला हे व्हिडीओ चिन्मयानंद यांना दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल करायची होती. यासाठी त्याचा त्याच्या चुलत भावावर देखील विश्वास नव्हता. त्यामुळे आता या प्रकरणात तो तुरुंगात आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like