अमेरिकेत होणार कोरोनापासून बचावासाठी आयुर्वेदिक औषधांचं क्लिनिकल ट्रायल

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –  अमेरिकेतील भारतातील राजदूत तरनजीत सिंह संधू यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेमध्ये आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक कोरोना व्हायरसविरूद्ध बचावासाठी आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल चाचणी सुरू करत आहेत. भारतीय-अमेरिकन शास्त्रज्ञ, विचारवंत आणि डॉक्टरांच्या समुहाशी डिजिटल संवाद साधताना संधू म्हणाले, संस्थात्मक भागीदारीच्या विस्तृत नेटवर्कद्वारे कोविड-19 विरूद्धच्या लढाईत दोन्ही देशांचे शास्त्रज्ञ एकत्र आले आहेत.

ते म्हणाले, ’संस्थांचे संयुक्त शोध, शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रमांद्वारे आयुर्वेदाच्या प्रचारासाठी संस्था एकत्र आल्या आहेत. दोन्ही देशांचे आयुर्वेदिक डॉक्टर आणि संशोधक कोविड-19च्या विरूद्ध बचावासाठी आयुर्वेदिक औषधांची संयुक्त क्लिनिकल चाचणी सुरू करण्याची योजना बनवत आहेत.

ते म्हणाले, आपले शास्त्रज्ञ या आघाडीवर ज्ञान आणि संशोधनाच्या साधनांचे आदान-प्रदान करत आहेत. भारतीय औषध कंपन्या स्वस्त औषधे आणि वॅक्सीन बनवण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि या महामारीविरूद्ध लढण्यात महत्वाची भूमिका त्या पार पाडतील.

तरनजीत सिंह संधू यांच्या माहितीनुसार, अमेरिकेतील संस्थांसोबत भारतीय औषध कंपन्यांच्या कमीतकमी तीन भागीदारी सुरू आहेत.

त्यांनी म्हटले की, यामुळे भारत आणि अमेरिकेला फायदा होईल, शिवाय संपूर्ण जगातील त्या अरबो लोकांना सुद्धा लाभ मिळेल, ज्यांना कोविड-19 पासून बचावासाठी वॅक्सीनची गरज आहे.