चीन सोडून बाहेर पडणार्‍या कंपन्यांना यायचंय भारतात, अमेरिकन कंपनी ‘मास्टर कार्ड’ ग्रामीण भागात गुंतवणूक करण्यास इच्छुक

लखनऊ : वृत्तसंस्था – परदेशी कंपन्यांना यूपीमध्ये आणण्याची योगी सरकारची मोहीम लॉकडाऊनच्या वेळीही चालू आहे. मास्टरकार्ड या अमेरिकन कंपनीने यूपी सरकारशी संपर्क साधला असून राज्यातील एमएसएमई क्षेत्रात सहकार्य करण्याची त्यांची इच्छा आहे. ग्रामीण भागातील क्रेडिट कार्ड योजनेत गुंतवणूक करण्याची त्यांची योजना आहे.

मास्टरकार्ड ही ग्लोबल पेमेंट आणि तंत्रज्ञानाची बहुराष्ट्रीय कंपनी आहे. ग्रामीण भागातील किराणा दुकानात डिजिटल पेमेंट सुविधांना प्रोत्साहन देण्याची मास्टरकार्डची रणनीती आहे. मास्टरकार्ड त्या अमेरिकन कंपन्यांपैकी आहे, जी चीनमधून आपला व्यवसाय भारतासह इतर अनेक देशांत हलवण्याच्या शोधात आहे. कंपनीने यूपीसह गुंतवणुकीच्या सहकार्यासाठी राज्याचे एमएसएमई आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना पत्र लिहिले आहे. खरं तर गेल्या महिन्यातच युनायटेड स्टेट्स इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपच्या फोरमवर यूपी सरकारने वेबिनारच्या माध्यमातून दोन डझन अमेरिकन कंपन्यांशी बोलून यूपीमधील उत्तम वातावरणाविषयी सांगितले होते.

आता शुक्रवारी यूएस इंडिया बिझनेस काउन्सिलच्या माध्यमातून सिद्धार्थ नाथ सिंह इतर मोठ्या अमेरिकन कंपन्यांच्या प्रतिनिधींशी गुंतवणूकीविषयी चर्चा करतील. याच दरम्यान चीनमधून शिफ्ट होणारी जर्मनीची प्रसिद्ध फुटवेअर कंपनी वॉन वेल्क्स उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांनी चीनमधून शिफ्ट होणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती तयार केली आहे. यात दोन वरिष्ठ मंत्री सिद्धार्थनाथ सिंह आणि औद्योगिक विकास मंत्री सतीश महाना देखील आहेत. मुख्यमंत्री उत्तर प्रदेशात जूनच्या अखेरीस किंवा जुलैमध्ये संबंधित देशांच्या राजदूतांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे युपीमध्ये गुंतवणूकीबाबत चर्चा करतील.

You might also like