जगातील ‘हे’ 3 शक्तीशाली देश ‘कोरोना’ वॅक्सीन खरेदी करण्यासाठी उत्सुक, 2 अरब पेक्षा जास्त ‘डोस’ची बुकिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रशियाची वादग्रस्त लस वगळता जगात अद्याप कोरोनाची कोणतीही लस आलेली नाही, परंतु श्रीमंत देशांमध्ये ही लस खरेदी करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. असा अंदाज आहे की २०२१ च्या अखेरपर्यंत जगात चार अब्ज डोस तयार होऊ शकतात, परंतु यापैकी दोन अब्जाहून अधिक डोस श्रीमंत देशांनी आपल्या लोकांसाठी आधीच खरेदी केले आहेत. या शर्यतीत कमी आणि मध्यम उत्पन्न असणारे देश मागे पडले आहेत.

नेचर जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात असे म्हटले आहे की, आठ मुख्य लसींवर सहा श्रीमंत देशांनी अगोदरच ताबा घेतला आहे. त्यांनी सहा लसींमध्ये दोन अब्ज डोस बुक केले आहेत. त्यांनी लस कंपन्यांशी करार केला आहे. त्यांना पैसेही दिले जात आहेत. रिपोर्टनुसार, अ‍ॅस्ट्रॅजेनिकाची लस सर्वात आधी येण्याची शक्यता आहे. कंपनी पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत २.९४ अब्ज डोसची निर्मिती करेल, त्यापैकी २.४ अब्ज डोस युरोप, अमेरिका, ब्रिटन, जपान आणि ९२ लघु व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांनी बुक केले आहेत. सर्वात मोठा वाटा विकसित देशांचा आहे.

आणखी एक लस नोव्हॅक्सची १.३५ अब्ज डोस तयार होण्याची शक्यता आहे, ज्यात यूएस आणि यूकेने १६ कोटी, फायजरच्या लसीत अमेरिका, जपान आणि यूकेने २३ कोटी, मोडर्ना लसीत अमेरिकेने १०.४५ कोटी, जॉनसन अँड जॉनसनच्या लसीमध्ये युरोप, अमेरिका आणि ब्रिटनने ३३ कोटी, स्नोफीच्या लसीमध्ये युरोप आणि अमेरिकेने ४६ कोटी, वाल्नेव्हा लसीमध्ये ब्रिटनने ६ कोटी, सिनोवाकमध्ये ब्रिटनने ३७ कोटी, युरोपने क्योरव्हॅकमध्ये २२.५ कोटी डोस खरेदी केले आहेत.

कोवॅक्स निधीतून अपेक्षा
गरीब आणि विकसनशील देशांना लस देण्यासाठी गॅव्हीने कोवाक्स फंड तयार केला आहे. त्यांनी दोन अब्ज डोस खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातील एक अब्ज ते ९२ कमी व मध्यम उत्पन्न असणार्‍या देशांना मोफत देतील आणि एक अब्ज लस ७५ श्रीमंत देशांना पैसे घेऊन देतील. अशाप्रकारे श्रीमंत देशांना या चॅनेलकडूनही एक अब्ज लसी मिळणार आहेत, पण त्यासाठी गॅव्हीला कंपन्यांना १८ अब्ज डॉलर्स अ‍ॅडव्हान्स द्यावे लागतील. त्यांनी अ‍ॅस्ट्रजेनिकासह ३० कोटींचा करार केला आहे.

ब्रिटनने प्रति नागरिक पाच डोस खरेदी केले
यूकेने सर्वाधिक प्रति नागरिक पाच डोसने लस खरेदी करण्यास सुरवात केली आहे. तर अमेरिका आणि युरोपियन युनियन प्रति व्यक्ती दोन डोस खरेदी करत आहेत. जपानही तसेच करत आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, सीरम इन्स्टिट्यूटने अ‍ॅस्ट्रोजेनिकाच्या लसीचे एक अब्ज डोस दरवर्षी तयार करण्याची घोषणा केली आहे, परंतु त्यातील निम्मी भारताला आणि निम्मी इतर देशांना पुरवली जाईल.