Coronavirus : भारतात ‘कोरोना’ डबलिंगचं प्रमाण 12 दिवस झालं, जगभरात सर्वात कमी 3.2 % मृत्यूचा दर – आरोग्य मंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, गेल्या १४ दिवसांत आपला दुप्पट दर, जो १०.५ दिवस होता, तो गेल्या ७ दिवसांत ११.७ दिवसांवर पोहोचला आणि आज तो १२ दिवस झाला आहे. याचबरोबर, जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण ३.२ टक्के आहे. इतकेच नाही तर कोरोना व्हायरस चाचणीसाठी रविवारपासून ३१० सरकारी आणि १११ खासगी चाचणी प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री म्हणाले की, ज्या देशात पीपीई किट आणि एन ९५ मास्क बाहेरून आयात केले जात आहेत. आज आपण एका दिवसात २ लाखाहून अधिक पीपीई किट बनवित आहोत. आपण देशात ५० लाखांहून अधिक एन ९५ मास्क आणि २० लाखाहून अधिक पीपीई किट वितरित केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, शनिवारी आम्ही दहा लाख चाचणींचा आकडा पार केला आणि एका दिवसात सुमारे ७४,००० चाचण्या घेतल्या. देशातील ३१९ जिल्हे या आजाराने बाधित नाहीत. येथे १३० जिल्हे हॉटस्पॉट आहेत, तर २८४ जिल्हे नॉन-हॉटस्पॉट आहेत. हर्षवर्धन यांनी सांगितले की, आम्ही जगातील ९९ देशांमध्ये हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, पॅरासिटामोल सारखी औषधे पुरविली आहेत.

देशात कोविड -१९ मृतांची संख्या वाढून १,३०१, एकून प्रकरणे ३९,९८०
रविवारी देशात कोविड -१९ मुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या वाढून १,३०१ झाली आहे तर संक्रमित लोकांची संख्या ३९,९८० वर पोहोचली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार २८,०४६ लोक अद्याप संक्रमित आहेत, तर १०,६३२ लोक निरोगी होऊन घरी गेले आहेत, ज्यात एक रुग्ण परदेशात गेला आहे. एकूण संक्रमित प्रकरणांत १११ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. माहितीनुसार शनिवारी सायंकाळपासून झालेल्या एकूण ७८ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात ३६, गुजरातमध्ये २६, मध्य प्रदेशात ६, राजस्थानातमध्ये ३, दिल्लीत तीन, तेलंगणामध्ये दोन आणि तामिळनाडू आणि बिहारमधील प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे.

देशातील प्राणघातक विषाणूमुळे होणाऱ्या एकूण १,३०१ मृत्यूंपैकी महाराष्ट्रात ५२१, गुजरातमध्ये २६२, मध्य प्रदेशात १५१, राजस्थानात ६५, दिल्लीत ६४, उत्तर प्रदेशात ४३, पश्चिम बंगाल ३३, आंध्र प्रदेशात ३३, तामिळनाडूमध्ये २९, तेलंगणामध्ये २८, कर्नाटकमध्ये २५, पंजाबमध्ये २०, जम्मू-काश्मीरमध्ये ८, केरळ, बिहार आणि हरियाणामध्ये प्रत्येकी चार, झारखंडमध्ये ३ तर मेघालय, हिमाचल प्रदेश, ओडिशा आणि आसाममध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. सकाळपर्यंत आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात संक्रमणाची सर्वाधिक १२,२९६ रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्यानंतर गुजरातमध्ये ५,०५४, दिल्लीत ४,१२२, मध्य प्रदेशात २,८४६, राजस्थानात २,७७०, तामिळनाडूमध्ये २,७५७ आणि उत्तर प्रदेशात २,४८७, आंध्र प्रदेशात १,५२५, तेलंगणामध्ये १,०६३, पश्चिम बंगालमध्ये ९२२, पंजाबमध्ये ७७२, जम्मू-काश्मीरमध्ये ६६६, कर्नाटकात ६०१, केरळमध्ये ४९९, बिहारमध्ये ४८१, हरियाणामध्ये ३६०, ओडिशामध्ये ११७, झारखंड ११५, चंदीगडमध्ये ८८, उत्तराखंडमध्ये ५९, आसाम आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी ४३-४३, तर हिमाचल प्रदेशात आतापर्यंत ४० प्रकरणांची नोंद आहे.

अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ३ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे तर लडाखमध्ये २२ संसर्ग होण्याच्या घटना घडल्या आहेत. मेघालयात १२, पुडुचेरीमधील आठ आणि गोव्यात कोविड -१९ ची सात प्रकरणे नोंदविली गेली आहेत. त्रिपुरामध्ये चार तर मणिपूरमध्ये दोन प्रकरणे आहेत. मिझोरम आणि अरुणाचल प्रदेशात एक प्रकरण समोर आलं आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, “१२४ प्रकरणे राज्यांना संक्रमित व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी निद्रिष्ट करण्यात आली आहेत.” मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर म्हंटले कि, त्यांचा डेटा आयसीएमआरच्या आकडेवारीशी जुळत आहे.