Corona Virus : ‘कोरोना’ व्हायरसचा ‘हाहाकार’ सुरूच, चीनमधील मृत्यूचा आकडा 636 वर, 31000 जणांना ‘लागण’

बिजिंग : वृत्त संस्था – चीनमध्ये घातक कोरोना व्हायरस लागोपाठ बळी घेत आहे. कोराना व्हायरसमुळे होणारे मृत्यू येथे थांबताना दिसत नाही. आता ही संख्या 600 च्या पुढे गेली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, चीनमध्ये कोरोना व्हायरसने मरणार्‍यांची संख्या सुमारे 636 झाली आहे. तर, या विषाणूंची लागण आतापर्यंत सुमारे 30 हजार पेक्षा जास्त लोकांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वृत्तसंस्था एएफपीनुसार, सरकारने शुक्रवारी माहिती दिली की, चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांची सख्या 31,161 झाली आहे. या व्हायरसचा संसर्ग झाल्याची सुमारे 3,143 नवी प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना व्हायरस हा विषाणुंचा एक मोठा समुह आहे. परंतु यापैकी केवळ सहाच विषाणूंचा संसर्ग होतो. याची ताप, सर्दी ही सामान्य लक्षणे आहेत. परंतु सिवीयर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) असा कोरोना व्हायरस आहे ज्याच्या प्रकोपामुळे 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सुमारे 650 लोकांचा मृत्यू झाला होता.

पहिल्यांदा माहिती देणार्‍या डॉक्टरचा मृत्यू

चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा प्रथम इशारा देणार्‍या आठपैकी एक असलेले चीनी डॉक्टर ली वेनलियांग यांचा गुरुवारी या आजाराने वुहानमध्ये मृत्यू झाला. वेनलियांग यांनी जेव्हा या धोक्याची सूचना सर्वात आधी दिली तेव्हा पोलिसांनी त्यांना त्रास दिला होता. सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सांगितले की, 34 वर्षीय वेनलियांग यांनी अन्य डॉक्टरांना या महामारीसंबंधी सूचना देण्याचा प्रयत्न केला होता.

काय आहे कोराना व्हायरस

कोरोना हा व्हायरसचा एक मोठा समूह आहे. जो जनावरांमध्ये सामान्यपणे आढळतो. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीएस) नुसार, कोरोना व्हायरस जनावरांकडून मनुष्याकडे पोहचतो. नवीन चीनी कोरोनो व्हायरस, सार्स व्हायरसप्रमाणे आहे. याच्या संसर्गाने ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास, नाक वाहणे आणि घशात खवयव आदी समस्या होतात. यामुळे न्यूमोनिया सुद्धा होतो. याची स्थिती मिडल ईस्ट रेस्पायरेट्री सिंड्रोम (एमईआरएस) आणि सेव्हल एक्युट रेस्पायरेट्री सिंड्रोम (सार्स) शी खुप मिळती जुळती आहे.

हाँगकाँग विश्वविद्यालयामध्ये स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे व्हायरोलॉजिस्ट लियो पून, ज्यांनी प्रथम या व्हायरसला डिकोड केले होते, त्यांना वाटते की, हा व्हायरस एका जनावरामध्ये सुरू झाला आणि मनुष्यामध्ये पसरला असण्याची शक्यता आहे.

कसा पसरतो?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोना व्हायरस एक जूनोटिक आहे. याचा अर्थ असा आहे की हा 2019-पउेत च्याद्वारे जनावरांकडून मानसात पसरतो. 2019-पउेत सीफूड खाल्ल्याने पसरला होता. परंतु आता कोरोना व्हायरस माणासाकडून माणसाकडे पसरत आहे. हा कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या कोणत्याही व्यक्तीकडून त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तीला होतो. खोकला, शिंकणे, हात मिळवणे यामुळे याचा धोका वाढतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीला स्पर्श केल्याने आणि नंतर आपले तोंड, नाक, डोळ्यांना स्पर्श केल्यास या व्हायरसचा संसर्ग होतो.

कोरोना व्हायरसची लक्षणे

या व्हायरसने मरणार्‍यांचे सरासरी वय 73 वर्ष आहे. मृतांमध्ये सर्वात जास्त वयाची व्यक्ती 89 वर्षांची होती. तर कमी वयाच्या 34 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये नाकातून पाणी वाहणे, खोकला, घशात खवखव, डोकेदुखी आणि ताप यांचा समावेश आहे. रोग प्रतिकारकशक्ती कमी असलेल्या लोकांना याची लागण जलद होते. वृद्ध आणि मुलांना याची लागण सहज होते. निमोनिया, फुफ्फुसामध्ये सूज, शिंका येणे, अस्थमाचा त्रास ही याची लक्षणे आहेत.

काय आहे याचा उपाय
यावर अद्याप कोणताही उपाय नाही. अजूनही कोरोना व्हायरसची कोणतीही लस तयार करण्यात आलेली नाही. यापासून वाचणे आणि सावधगिरी बाळगणे हाच उपाय आहे.