‘कोरोना’ प्रभावित देशांच्या यादीत स्पेनला मागे टाकून भारत पोहचला 5 व्या स्थानावर, 2 लाख 45 हजार बाधित तर 6600 पेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारत शनिवारी (6 जून) ला स्पेनला मागे टाकत कोरोना व्हायरस जागतिक महामारीने वाईट प्रकारे प्रभावित जगातील पाचवा देश बनला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठानुसार भारतात कोविड-19 संक्रमणाची प्रकरणे वाढून 2 लाख 45 हजार 670 झाली आहेत, तर 6600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारत मागील 24 तासापेक्षाही कमी वेळात या महामारीच्या प्रकरणांच्या संख्येचा विचार करता इटली आणि स्पेनच्याही पुढे गेला आहे. आता अमेरिका, ब्राझील, रशिया आणि ब्रिटनच या प्रकरणांमध्ये भारताच्या पुढे आहेत. या विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार स्पेनमध्ये आतापर्यंत महामारीमुळे 2 लाख 41 हजार 310 प्रकरणे समोर आली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार भारतात शनिवारी (6 जून) सकाळी आठ वाजेपर्यंत मागील 24 तासात 9887 नवे रूग्ण समोर आले आणि 294 रूग्णांचा मृत्यू झाला. ज्यानंतर मृतांची संख्या वाढून 6,642 झाली आहे. देशात आता संसर्गाची प्रकरणे 2 लाख 36 हजार 657 झाली आहेत, तर मृतांची संख्या 6642 झाली आहे. देशात लागोपाठ तिसर्‍या दिवशी नऊ हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशात 1 लाख 15 हजार 942 संक्रमित रूग्णांवर उपचार सुरू आहे, तर 1 लाख 14 हजार 72 लोक बरे झाले आहेत, ज्यापैकी 4,611 रूग्ण मागील 24 तासात बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, आतापर्यंत 48.20 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. संसर्गाच्या प्रकरणात परदेशी नागरिकसुद्धा आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 45 लाख 24 हजार 317 नमून्यांची तपासणी करण्यात आली. यातून 4 लाख 37 हजार 938 नमून्यांची तपासणी मागील 24 तासात झाली आहे.

देशात या भयंकर व्हायरसमुळे आतापर्यंत 6,642 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वात जास्त 2,849 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. यानंतर गुजरातमध्ये 1,190, दिल्लीत 708, मध्य प्रदेशमध्ये 384, पश्चिम बंगालमध्ये 366, उत्तर प्रदेशमध्ये 257, तमिळनाडुमध्ये 232, राजस्थानमध्ये 218, तेलंगानामध्ये 113 आणि आंध्र प्रदेशमध्ये 73 , कर्नाटकममध्ये 57 आणि पंजाबमध्ये 48 लोकांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये 36 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर बिहारमध्ये 29, हरियाणामध्ये 24, केरळात 14, उत्तराखंडमध्ये 11, ओडिसामध्ये 8 आणि झारखंडमध्ये 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि चंडीगढमध्ये कोविड-19 मुळे 5-5 लोकांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये 4 तर छत्तीसगढमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मेघालय आणि लडाखमध्ये एक- एक रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार मृतांमध्ये 70 टक्के असे लोक आहेत जे अगोदरच विविध आजाराने त्रस्त होते. आरोग्य मंत्रालयाद्वारे शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशात संसर्गाची सर्वात जास्त 80,229 प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. यानंतर तमिळनाडुत 28,694, दिल्लीत 26,334, गुजरातमध्ये 19,094, राजस्थानमध्ये 10,084, उत्तर प्रदेशात 9,733 आणि मध्य प्रदेशात 8,996 लोक संक्रमित झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये संक्रमितांची संख्या वाढून 7,303 झाली आहे. यानंतर कर्नाटकमध्ये 4,835, बिहारमध्ये 4,596 आणि आंध्र प्रदेशात 4,303 रूग्ण आहेत.

हरियाणात कोरोना व्हायरसचे 3,597, जम्मू-काश्मीरमध्ये 3,324, तेलंगानामध्ये 3,290 आणि ओडिसामध्ये 2,608 प्रकरणे आहेत. पंजाबमध्ये 2,461, आसाममध्ये 2,153, केरळात 1,699, उत्तराखंडमध्ये 1,215 लोग संक्रमित आहेत. झारखंडमध्ये 881, छत्तीसगढमध्ये 879, त्रिपुरामध्ये 692, हिमाचल प्रदेशमध्ये 393, चंडीगढमध्ये 304, गोवामध्ये 196, मणिपुरमध्ये 132 आणि पुदुचेरीमध्ये 99 प्रकरणे आहेत. लडाखमध्ये 97, नागालँडमध्ये 94, अरुणाचल प्रदेशमध्ये 45, तर अंदमान आणि निकोबार बेटे आणि मेघालयमध्ये संक्रमणाची 33-33 प्रकरणे आहेत. मिझोराममध्ये 22, दादरा आणि नगर हवेलीमध्ये 14 आणि सिक्किममध्ये कोविड-19 ची 3 प्रकरणे आहेत.

मंत्रालयाने म्हटले, एकुण 8,192 प्रकरणे राज्यांना परत पाठवण्यात आली आहेत. आमचे आकडे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) शी पडताळून जारी करण्यात येतात. राज्यनिहाय आकड्यांची आणखी पडताळणी करण्याची गरज आहे.