Advt.

बंपर होतेय कोरोनीलची विक्री ? बाबा रामदेव म्हणाले – ‘दररोज 10 लाख पॅकेटची मागणी, पूर्ण करण्यासाठी पतंजलीची धडपड’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसच्या कहरात बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या कोरोनिल मेडिसिनची मार्केटमध्ये बरीच मागणी आहे. योगगुरू रामदेव यांचा असा दावा आहे की, कोविड-19 साठी प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या वादग्रस्त औषध कोरोनिलसाठी पतंजली आयुर्वेदला दररोज 10 लाख पॅकेटची मागणी होत आहे. रामदेव यांनी बुधवारी सांगितले की, दररोज फक्त एक लाख पॅकेट्स पुरवण्यात सक्षम असल्याने हरिद्वार येथील कंपनी ही मागणी पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे.

बाबा रामदेव यांनी सांगितले कि, पंतजली आयुर्वेदच्या या औषधाची किंमत फक्त 500 रुपये होती. कोरोना विषाणूच्या साथीच्या युगातही जर आपण त्याचे जास्त शुल्क म्हणजेच जर 5000 रुपये ठेवले असते तर 5,000 कोटी रुपयेसुद्धा सहज मिळवता आले असते. पण आम्ही तसे केले नाही.

रामदेव बाबा यांनी उद्योग संस्था असोचैनने आयोजित केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत – वोकल फॉर लोकल ‘ ला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. जूनच्या सुरुवातीस रामदेव बाबा यांनी असा दावा केला होता की, कोरोनिल कोविड -19 रुग्णांना बरे करू शकते. दरम्यान, आयुष मंत्रालयाने त्वरित या विक्रीवर बंदी घातली आणि नंतर केंद्रीय मंत्रालयाने म्हटले आहे की पतंजली हे उत्पादन केवळ प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीचे औषध म्हणून विकू शकते आणि कोविड – 19 च्या उपचार म्हणून विक्री करू शकत नाही.

ते म्हणाले, “आम्ही आमच्या गायीच्या तूपाला 1,300-1,400 कोटी रुपयांचे वार्षिक ब्रॅण्ड बनवले आहेत, पतंजली समूहाची अंदाजे उलाढाल सुमारे 10,500 कोटी आहे.