ऑक्सफर्डच्या वॅक्सीननं माकडांवर केली ‘कमाल’, व्हायरसला ‘जीवघेणा’ बनण्यास रोखलं, जाणून घ्या काय-काय झालं

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा कहर संपूर्ण जगात सुरू आहे आणि यावरील वॅक्सीनसाठी प्रत्येक ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान एक चांगली बातमी आहे की, ऑक्सफर्डच्या वॅक्सीनने आशेचा किरण दाखवला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वॅक्सीनचे माकडांवरील परीक्षण यशस्वी झाले आहे. वॅक्सीन दिल्यानंतर माकडांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये व्हायरसचा प्रभाव कमी झाला.

मेडिकल जर्नल नेचरमध्ये प्रकाशित अभ्यासात ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेचे संशोधक आणि ऑक्सफर्डला आढळले की, वॅक्सीन माकडांना कोविड-19 मुळे निर्माण होणार्‍या घातक निमोनियापासून वाचवण्यात यशस्वी ठरली.

या यशानंतर ऑक्सफर्डने मानवी परीक्षण सुरू केले होते, ज्यामधील प्राथमिक परिणाम यशस्वी आहेत. कोरोनाच्या संसर्गानंतर फुफ्फुसांमध्ये सूज येते आणि त्यांच्यामध्ये एकप्रकारचे द्रव्य जमा होते.

ऑक्सफर्डची वॅक्सीन चेडॉक्स एनकॉव 19 चिंपाझीमध्ये आढळणार्‍या एका कमजोर व्हायरसपासून बनवली आहे, या व्हायरसने सामान्य सर्दी, ताप बरा होतो. संशोधकांनी सांगितले की, सहा माकडांना कोरोना संसर्गात आणण्यापूर्वी 28 दिवस अगोदर ही लस दिली गेली होती. या लसीने फुफ्फुसांना नुकसान होण्यापासून वाचवले आणि व्हायरसचे प्रमाण कमी केले. नंतर माकडांना बूस्टर डोस सुद्धा देण्यात आला, ज्यामुळे प्रतिकारशक्ती आणखी वाढली.

संशोधकांनी म्हटले की, अभ्यासातून हे संकेत मिळाला की, ही लस भलेही संसर्ग किंवा तिचा प्रसार रोखू शकली नाही तरी ही आजाराला जीवघेणा होऊ देणार नाही. या परीक्षणानंतर ऑक्सफर्डने जुलैपासून मानवी परीक्षणासाठी आठ हजार वॉलिंटियरची भरती केली होती.