‘या’ 5 कारणांमुळे भारतात पुन्हा वेगाने का वाढतोय कोरोनाचा ‘कहर’ ?, ज्यांनी वाढवलं देशाचं ‘टेन्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरस संसर्गाचा ग्राफ वाढू लागला आहे. मागील दोन दिवसांपासून 16 हजारपेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि रोज होणार्‍या मृत्यूंची संख्यासुद्धा शंभरच्या पुढे गेली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, नवा स्ट्रेन आणि लसीकरणातील उशीरासह पाच अशी कारणे आहेत जी नियंत्रणात आलेल्या महामारीच्या स्थितीला पुन्हा बिघडवत आहेत. यावर मोदी सरकारला ताबडतोब पावले उचलावी लागतील.

1. राजच्या कोरोना टेस्ट अर्धवट राहिल्या
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या डाटानुसार, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये देशात दररोज दहा लाखांपेक्षा जास्त नमूण्यांची कोविड-19 चाचणी केली जात होती. मात्र, या वर्षी फेब्रुवारी येता-येता देशात चाचण्या इतक्या घटल्या की दररोज सुमारे सहा ते आठ लाखापर्यंतच चाचण्या होत आहेत. मागील चोवीस तासात सुद्धा देशात 8,31,807 नमूण्यांची चाचणी झाली. देशात आतापर्यंत 21,46,61,465 नमूण्यांची चाचणी झाली आहे.

2. नमूण्यांच्या पॉझिटिव्ह दरात वाढ
देशात रोज होणार्‍या कोरोना चाचण्यांचा दर घटण्यासह नमूने पॉझिटिव्ह येण्याचा दर 5 टक्केपेक्षा जास्त झाला आहे. ही स्थिती सांगते की, गरजेपेक्षा कमी तपासण्या होत आहेत आणि जेवढ्या चाचण्या होत आहेत, त्यामध्ये पॉझिटिव्ह प्रकरणांचा दर जास्त आहे. मागील महिन्यात देशात टेस्ट पॉझिटिव्हीटी दर जवळपास 6 टक्के होता जो या महिन्यात 5 टक्क्यांनी जास्त झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे की, कोणत्याही देशाचा टेस्ट पॉझिटिव्हीटी दर लागोपाठ दोन आठवड्यांपर्यंत पाच टक्के किंवा कमी असायला हवा, तेव्हाच संसर्गावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

3. कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा परिणाम
भारत सरकारने सांगितले आहे की, ब्रिटनमध्ये सर्वात अगोदर सापडलेल्या व्हायरसच्या नव्या स्ट्रेनची देशात 180 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली आहेत. सोबतच दक्षिण अफ्रीका आणि ब्राझीलमधून जगातील इतर भागात पसरलेल्या आणखी एका नव्या स्ट्रेनची सुद्धा प्रकरणे देशात आढळली आहेत.

4. बचावाच्या पद्धतींमध्ये निष्काळजीपणा
अंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनुसार, डिसेंबर-जानेवारीमध्ये देशात कोरोना संसर्ग कमी झाला, ज्यानंतर लोक निष्काळजीपणा करू लागले आणि चाचण्यासुद्धा कमी झाल्या. या कारणामुळे देशातील महाराष्ट्रासह पाच राज्यांत संसर्गाची प्रकरणे वाढली आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांनी काळजी घेतली पाहिजे, कारण असे अनेक लोक असतील ज्यांच्यात संसर्ग आहे पण लक्षणे नाहीत.

5. लोकसंख्येच्या तुलनेत संथगतीने लसीकरण
ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे संचालित अवर वर्ल्ड इन डाटानुसार, भारतात प्रति शंभर लोकांमध्ये केवळ एकाला लस दिली जात आहे. तर ब्रिटनमध्ये प्रत्येक शंभर लोकांपैकी 27 आणि अमेरिकेत 19 लोकांना लस दिली जात आहे. भारताचे लक्ष्य जुलैपर्यंत 30 कोटी लोकांना लस देण्याचे आहे, ज्यामध्ये तो खुप पाठीमागे आहे. आतापर्यंत देशात एकुण 1,34,72,643 लोकांनाच लस दिली गेली आहे. तर मार्चच्या अखेरपर्यंत देशात 3 कोटी लोकांना लस द्यायची आहे. एक मार्चपासून देशात 27 कोटी ज्येष्ठ आणि गंभीर रूग्णांना लस दिली जाणार आहे. भारत सरकारचे आकडे सांगतात की, देशात लसीकरणाच्या प्रत्येक सेशनमध्ये लक्ष्याच्या तुलनेत 35 टक्केच लसीकरण झाले.