घोर निराशा ! ‘कोरोना’चं वॅक्सीन 2021 पूर्वी येणं अशक्य : मोदी सरकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   भारत बायोटेकने कोरोना वॅक्सीन 15 ऑगस्टपर्यंत लाँच करण्याचा दावा केलेला असताना विज्ञान मंत्रालयाने मात्र म्हटले आहे की, कोणतीही वॅक्सीन 2021 पूर्वी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. विज्ञान आणि औद्योगिक मंत्रालयाने रविवारी म्हटले की, जगात तयार होत असलेल्या 140 वॅक्सीनपैकी 11 ह्यूमन ट्रायल फेजमध्ये पोहचल्या आहेत, परंतु ही शक्यता नाही की, यापैकी कोणतीही वॅक्सनी पुढील वर्षाच्या पूर्वी उपलब्ध होण्यासाठी तयार होऊ शकते.

ह्यूमन ट्रायल फेजपर्यंत पोहचलेल्या 11 वॅक्सीनमधील दोन भारतीय आहेत. पहिली आयसीएमआरच्या सहकार्याने भारत बायोटेकने तयार केली आहे तर दुसरी जायडस कॅडिलाने विकसित केली आहे. त्यांना मानवी परीक्षणाची परवानगी मिळाली आहे.

मंत्रालयाने म्हटले की, सहा भारतीय कंपन्या वॅक्सीनवर काम करत आहेत. दोन भारतीय वॅक्सीन COVAXIN आणि ZyCov-Dसह 11 वॅक्सीन मानवी परीक्षणाच्या फेजमध्ये आहेत. यापैकी कोणतीही 2021च्या अगोदर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता नाही.

2 जुलैला आयसीएमआरने वॅक्सीनच्या ट्रायलसाठी निवडलेल्या 12 क्लिनिकल साइटच्या प्रमुखांना पत्र लिहून वॅक्सीनची ट्रायल 15 ऑगस्टच्या अगोदर पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. पीम मोदी यांना 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून वॅक्सीनची घोषणा करता यावी, म्हणून तिचे घाईघाईत मानवी परिक्षण केेले जात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

दरम्यान, आयसीएमआरच्या या पत्रावर आरोग्य तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आणि म्हटले की, वॅक्सीन लाँच करण्याची इतकी घाई करताना गुणवत्तेशी तडजोड होऊ नये. अशा डेडलाइनमध्ये काम केल्याने अर्धवट डेटासोबतच वॅक्सीन लाँच होईल. आयसीएमआरने आपले स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांनी संपूर्ण प्रक्रिया लालफीताशाही पासून वाचवण्यासाठी असे लिहिले होते.

आयसीएमआरने रविवारी म्हटले की, सर्व मेडिकल हॉस्पिटलमध्ये अशा परिक्षणांच्या अनुमोदनासाठी आचार समिती असते. या समित्यांच्या बैठका ठरलेल्या वेळेवर होतात. अशात कोविड-19 वॅक्सीनच्या मानवी परीक्षणाच्या मंजूरीला विनाकारण उशीर होऊ नये, यासाठी सर्व क्लिनिकल ट्रायल साईट प्रमुखांना पत्र लिहिलण्यात आले होते.

आयसीएमआरने आपली बाजू मांडताना म्हटले की, त्यांच्यासाठी देशातील जनतेची सुरक्षितता आणि सर्वहित महत्वाचे आहे. प्री क्लिनिकल स्टडीच्या डेटाचे बारकाईने निरिक्षण केल्यानंतर भारतीय औषध महानियंत्रकांनी टप्पा एक आणि टप्पा दोनच्या क्लिनिकल ट्रायलला मंजूरी दिली आहे.

आयसीएमआरने आंध्रप्रदेश, हरियाणा, नवी दिल्ली, बिहार, कनार्टक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडु, तेलंगना, ओडिसा आणि गोवाच्या हॉस्पिटलना क्लिनिकल ट्रायलसाठी निवडले आहे. याच हॉस्पिटल्समध्ये कोविड-19 च्या वॅक्सीनच्या दोन टप्प्यांच्या मानवी परीक्षणासाठी उमेदवार निवडले जातील.