‘व्हॅक्सीन’च वाचवणार ! जिथं लसीकरण वाढले, तिथं जास्त जीवघेणा नाही ‘कोरोना’, जगातील आकडे देताहेत पुरावे; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसचा कहर केवळ लसीकरणानेच कमी होऊ शकतो. अनेक देशांनी लसीकरणाचा वेग वाढवला आहे. व्हॅक्सीनबाबत एक विश्लेषण समोर आले आहे की, जिथे लसीकरण वाढले, तिथे कोरोना व्हायरस जास्त जीवघेणा ठरला नाही. मात्र, ब्रिटिश वृत्तपत्र ‘द गार्डियन’ चे अलिकडचे विश्लेषण सांगते की, जगातील बहुतांश देशात लसीकरणाचे समाधानकारक परिणाम दिसणे अजून बाकी आहे. लस पुरवठ्याची कमतरता, सुरक्षा चिंता, लोकांमधील निष्काळजीपणा आणि सरकारी मंजूरीची किचकट प्रक्रिया हे याचे मुख्य कारण आहे. भारतात सुद्धा याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

वृत्तपत्रानुसार, कोरोनाच्या विध्वंसावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतासह बहुतांश देशांना अजूनही लॉकडाऊन किंवा विलगीकरणाचे उपाय लागू करण्यास भाग पडत आहे. तर, 31 जानेवारी 2021 च्यानंतरचे आकडे दर्शवतात की, ज्या देशांचा लसीकरणाचा दर जास्त आहे, तिथे कोविड-19 ने मृत्यूच्या आकड्यात उल्लेखनीय घट झाली आहे. मात्र, चिली या बाबतीत अपवाद आहे. तिथे सार्स-कोव्ह-2 व्हायरसच्या ब्राझीलियन व्हेरियंटचे अस्तित्व आणि वेगाने प्रतिबंध हटवल्याने मोठ्या प्रमाणात लसीकरण करूनही कोविडच्या मृत्यूदरात घसरण नोंदली गेलेली नाही.

जाणून घ्या आकडे कसे देत आहेत पुरावा
सध्या जगभरात 90 कोटीपेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची व्हॅक्सीन देण्यात आली आहे. ब्रिटनचे आकडे पाहिले तर 31 जानेवारीनंतर कोरोना व्हायरसमुळे 95 टक्के घट दिसत आहेत. याचे मुख्य कारण सर्व प्राथमिक समुहांना लसीकरण हे आहे. जिथे 76 देशांमध्ये प्रत्येक शंभर लोकांवर सरासरी दहापेक्षा कमी लस दिली गेली आहे. तर जानेवारीच्या नंतर मृत्यू खुप वाढले आहेत. तर, ज्या देशांमध्ये 100 लोकांमध्ये किमान 50 लशी दिल्या गेल्या, तिथे मृत्यूदर घटला आहे.

व्हॅक्सीननंतर कोणत्या देशात घटले मृत्यू

झिब्राल्टर : 100%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 196.59
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 0

इस्त्रायल : सुमारे 95%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 119.32
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 5

ब्रिटन : सुमारे 95%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 63.02
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 26

डेन्मार्क : सुमारे 95%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 26.9
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 2

मोनाको : सुमारे 90%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 58.49
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 0

अमेरिका : सुमारे 80%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 62.61
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 712

माल्टा : सुमारे 75%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 62.2
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 1

संयुक्त अरब अमीरात : सुमारे 60%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 97.37
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 3

सिशेल्स : सुमारे 50%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 114.09
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 0

लिथुआनिया : सुमारे 60%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 28.41
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 10

ओमान : सुमारे 830%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 3.78
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 14

केनिया : सुमारे 640%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 1.21
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 19

भारत : सुमारे 600%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 8.97
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 1227

इथियोपिया : सुमारे 490%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 0.37
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 28

बांगलादेश : सुमारे 390%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 4.3
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 92

इराक : सुमारे 370%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 0.49
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 38

पॅराग्वे : सुमारे 300%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 1.23
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 69

ग्रीस : सुमारे 210%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 23.91
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 82

बोस्निया आणि हर्जेगोविना : सुमारे 210%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 0.46
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 70

इराण : करीब 200%
– प्रत्येक शंभर लोकांवर किती डोस दिसले गेले : 0.55
– 31 जानेवारी 2021 च्यानंतर सरासरी दैनिक मृत्यू : 320