कचऱ्यामुळे गायींवरही संकट, गायीच्या पोटातून काढले तब्बल 71 किलोंचे प्लास्टिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक ठिकाणांवर फेकला जाणारा प्लास्टिक कचरा प्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. हा प्लास्टिकचा कचरा हरियाणाच्या फरिदाबादमधील गायींच्या जीवावर उठला आहे. एका गायीच्या पोटातून तब्बल 71 किलोंचा प्लास्टिक बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे पशू वैद्यकीय अधिकारीही चांगलेच हैराण झाले आहेत.

फरिदाबाद येथील ही गाय गरोदर होती. एका रस्ते अपघात ही गाय जखमी झाली होती. मात्र, तिच्यावर 4 तास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी या गायीच्या पोटातून नखे, प्लास्टिक, मार्बलसह इतर काही कचरा बाहेर काढला. याबाबतची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष रवि दुबे यांनी दिली आहे. डॉक्टरांनी या गायीची प्री-मॅच्युअर डिलिव्हरीही करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा सापडल्याने तिच्या मृत्यू झाला. तसेच या गाईच्या पोटातील वासरूचा यामध्ये मृत्यू झाला.

सुमारे 50 लाख गायी फिरतात रस्त्यावर
एका रिपोर्टनुसार, देशातील विविध शहरात रस्त्यांवरून सुमारे 50 लाख गायी फिरतात. त्याचं कारण म्हणजे त्यांना गरजेला चारा न मिळणे हे आहे. खायला न मिळाल्याने या गायी रस्त्यावरील कचरा खातात. त्यामुळे अनेकदा हा कचरा खाल्ल्यानेच त्यांचा मृत्यू होतो. पण हे लक्षात घेता वेळोवेळी सरकारी आणि काही एनजीओ गायींना वाचवण्यासाठी पुढे येतात. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्थाही करतात.