दावा : 75 हजार रूपयात विकला जातोय Truecaller च्या सुमारे 5 कोटी भारतीयांचा डाटा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका सायबर गुन्हेगाराने 4.75 करोड भारतीयांची माहिती विक्रिसाठी खुली ठेवली आहे. या सायबर गुन्हेगाराचा दावा आहे की, त्याने ही माहिती ऑनलाइन डिरेक्टरी ट्रूकॉलरकडून मिळवली आहे. त्याने ही माहिती 75,000 रुपयात विक्रि करण्यासाठी ठेवली आहे. ऑनलाइन इंटेलिजन्स कंपनी सायबलने ही माहिती दिली आहे.

मात्र, ट्रूकॉलरच्या प्रवक्त्याने आपल्या डाटाबेसमध्ये कोणतीही चोरी झाली नसल्याचे म्हटले आहे. विश्वसनीय वाटण्यासाठी हा डाटाबेस कंपनीच्या नावाचा वापर करून विकला जात आहे, असे म्हटले आहे.

सायबलने ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, आमच्या तज्ज्ञांनी एक प्रसिद्ध विक्रेत्याची ओळख पटवली आहे, जो 4.75 करोड भारतीयांचा ट्रूकॉलर रेकॉर्ड 1,000 डॉलर किंवा सुमारे 75,000 रुपयात विकण्यास तयार आहे. हा डाटा 2019 चा आहे. एवढी कमी किंमत लावल्याचे पाहून आम्हाला आश्चर्य वाटत आहे. जो डाटा विक्रिसाठी ठेवला आहे, त्यामध्ये फोन नंबर, महिला आणि पुरुषांची माहिती, शहर, नेटवर्क अणि फेसबुक आयडीची माहिती आहे.

सायबलने म्हटले, आमचे तज्ज्ञ आणखी माहिती घेत आहेत. परंतु, याप्रकारामुळे भारतीयांवर निश्चित परिणाम होऊ शकतो. सायबलने म्हटले, याबाबत आणखी माहिती मिळाल्यानंतर ती ब्लॉगवर टाकली जाईल.

तर ट्रूकॉलरच्या प्रवक्त्याने म्हटले की, आमच्या डाटाबेसमध्ये कोणतीही चोरी झालेली नाही. आमची सर्व माहिती सुरक्षित आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या प्रायव्हसीची काळजी गांभीर्याने घेतो. कंपनीकडे माहिती आहे की, मे 2019 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे डाटा विकण्याचा प्रयत्न केला गेला होता.