गुजरातमध्ये धडकलेल्या चक्रीवादळाला ‘वायू’ हे नाव कोणी दिलं ; जाणून घ्या चक्रीवादळांचे ‘नामकरण’ कसं होतं

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – ओडिशाच्या किनारपट्टीला ‘फणी’ चक्रीवादळाने धडक दिल्यानंतर आता गुजरातच्या किनारपट्टीला ‘वायू’ या चक्रीवादळाने धडक दिली आहे. फणी, वायू अशी वादळांची नावे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की, चक्रीवादळाची अशी नावे कोणी ठेवली? याच प्रश्नाच्या उत्तराचा आपण शोध घेऊ या.

कशी ठेवली जातात चक्रीवादळांना नावे?

अटलांटिक क्षेत्रातील चक्रीवादळांची नावे १९५३ पासून ठरण्यास सुरुवात झाली आहे. हिंद महासागर क्षेत्रातील आठ देशांनी भारताच्या मागणीनुसार या चक्रीवादळांचे २००४ पासून नामकरण करण्याची व्यवस्था करून दिली.

या आठ देशांमध्ये बांगलादेश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, थायलंड आणि श्रीलंकेचा समावेश आहे. प्रत्येक देशाने वादळासाठी प्रत्येकी ८ अशी ६४ नावे ठरवून दिली आहेत. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू ही आठ नावे सुचवलेली होती.

भारताने सुचवले ‘वायू’ हे नाव

गुजरातच्या किनारपट्टीवर धडकलेल्या वादळाचे वायू हे नाव भारताने ठेवले आहे. आठ देशांनी सुचवलेल्या ६४ नावांपैकी ५७ नावांचा वापर झाला आहे. भारताने अग्नी, आकाश, बिजली, जल, लहर, मेघ, सागर, वायू अशी आठ नावे सुचवली होती. भारताने सुचवलेल्या आठव्या नावाचा वापर गुजरातच्या किनारपट्टीला धडकलेल्या वादळाला देण्यात आले. श्रीलंका, बांग्लादेश आणि पाकिस्तान यांनी अनुक्रमे माला, हेलेन आणि निलोफर ही नावे सुचवली होती. या सुचवलेल्या नावांचा वापर पुन्हा करता येत नाही. पण अटलांटिक आणि ईस्टर्न पैसिफिक विभागात काही वर्षाच्या अंतराने जुनी नावे पुन्हा दिली जातात.

इतिहास

पाश्चिमात्य देशांकडून वादळांना नावे देण्याची सुरुवात झाली. ताशी ६५ किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचे नामकरण केले जाते. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावे दिली जातात. नावे देताना कुणाच्या भावना न दुखवण्याची सूचना दिली जाते.

महासागरानुसार काही झोन तयार करण्यात आले आहेत. त्या-त्या झोनमधील देशांनी नावे सुचवायची आणि जसजशी चक्रीवादळे येतील, तशी अनुक्रमे येणाऱ्या वादळांना नावे द्यायची हा नियम आहे. भारत नॉर्थ इंडियन ओशनिक झोनमध्ये येतो.

तुम्हीही सुचवू शकता नाव

चक्रीवादळाचे नाव कोणीही सुचवू शकते. ते ठरविण्यापूर्व मात्र नाव छोटे आणि लक्षवेधी असावे, या नावातून सामाजिक अथवा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे. उपखंडातील त्या देशाची ओळख किंवा वैशिष्ट्यपूर्ण बाब या नावात असल्यास ते पटकन भावते. डायरेक्टर जनरल ऑफ मटेरॉलॉजी, इंडिया मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट, मौसम विभाग, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर चक्रीवादळासाठी सुचलेले नाव पाठवता येते.

आरोग्य विषयक वृत्त – 

मुलांचे केस गळण्यामागे असू शकतात ‘ही’ मोठी कारणे

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय