कोरोनाची लक्षणे दिसल्यास स्वतः डॉक्टर नका बनू, जाणून घ्या कोणती औषधं घेण्यास तज्ञांनी सांगितलं

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारत सध्या covid-19 संक्रमणामुळे दुसऱ्या लाटेच्या जाळ्यात आला आहे. ज्या वेगाने साथीचा रोग पसरत आहे त्या स्थितीमुळे परिस्थिती नियंत्रणात नाही. सध्या, कोरोना संक्रमित लोक ज्यांना लक्षणे दिसत नाहीत किंवा गंभीर स्थितीत नाहीत त्यांना घरी अलिप्त राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

भारतात एकूण १.५५ लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे आणि येथे २ लाख ३१ हजार ९७७ प्रकरणे सक्रिय आहेत. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हायरसमुळे मरण पावलेल्या लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत म्हणाले की, ”हे आव्हान मोठे आहे, आपल्याला दृढ संकल्प, धाडस आणि तत्परतेने यावर मात केली पाहिजे.”

लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देताना, १ मे पासून १८ वर्षावरील सर्व लोकांसाठी लस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्याचवेळी, संसर्ग झाल्यानंतर किंवा लक्षणांचा संशय असल्यास लोक ऑनलाईन उपचार करण्यासाठी औषधें वाचत आहेत आणि त्या औषधांची मागणी केली जात आहेत. अशा परिस्थितीत टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सीएस प्रमेश यांनी कोरोना संसर्ग झाल्यास कोणती औषधे घ्यावी हे सांगितले आहे.

कोणती औषधे रुग्णांचे आयुष्य वाचवू शकते किंवा रुग्ण रिकव्हर होण्यास मद्दत करतील?
डॉ. प्रमेश म्हणाले की या आजारावर फार कमी औषधे उपलब्ध आहेत. फक्त हे लक्षात ठेवा की जेव्हा ऑक्सिजनची पातळी खाली येते तेव्हा फक्त ऑक्सिजनच जीव वाचवू शकतो. काही स्तरापर्यंत मध्यम गंभीरतेपासून जास्त धोकादायक स्तरातील आजारावर स्टेरॉयड(Dexamethasone) काम करते.

संसर्ग झाल्यानंतर कोणती औषधे घ्यावीत?
डॉ. प्रमेश म्हणाले की जर तुमची ऑक्सिजनची पातळी चांगली असेल आणि कोणत्याही प्रकारची लक्षणे किंवा समस्या उदभवू नयेत असे वाटत असेल तर केवळ ‘पॅरासिटोमॉल’ यासाठी पुरेसे आहे. ते म्हणाले की कधी कधी असेही वाचनात येते की कोरोना रुग्णांना बुडसोनाइडने फायदा होतो. रुग्णांनी या औषधाचा वास घेतल्यास रिकव्हरी लवकर होते. परंतू त्यामुळे मृत्युदर घटतो ही गोष्ट चुकीची आहे. वैज्ञानिक तथ्ये अशी सूचित करते की औषधे मृत्युदर कमी करण्यासाठी मदत करत नाहीत आणि फेव्हीपीरावीर/इवरमेक्टीन च्या मागे पळण्यात काही फायदा नाही. या औषधांसाठी स्पर्धा करणे आपला वेळ वाया घालविण्यासारखे आहे.

रेमडेसिविर, टॉसिलिजुमैब आणि प्लाझ्मा मुळे किती फायदा?
डॉ. प्रमेश यांनी सांगितले की रामडेसिविर मोठ्या प्रमाणावर मदत करत नाही आणि हे सर्व रुग्णांवर कार्य करत नाहीत. असे काही रुग्ण आहेत ज्यांच्यावर हे औषध मदत करते. परंतू जरी एखाद्याची ऑक्सिजन पातळी घटली असेल आणि तो श्वास घेण्याच्या स्थितीत नसेल किंवा व्हेंटिलेटरवर असेल तरीही त्याचादेखील परिणाम होत नाही. हे औषध सुरवातीला रुग्णाला बरे करण्यास मदत करते, परंतू यामुळे मृत्युदर कमी होत नाही. टोसिलीजुमैब हे एक औषध आहे, जे फारच कमी लोकांना प्रभावित करते. त्याच वेळी, प्लाझ्मा बऱ्याच अभ्यासांमध्ये फायदेशीर नसल्याचे सांगितले जात आहे. डॉ. प्रमेश यांनी सांगितले की डॉक्टरांना ठरवू द्या की तुम्हाला रेमडेसिविर अथवा टोसिलीजुमैब अथवा आणखीन कोणते औषध उपयुक्त आहे. डॉक्टरांवर ही औषधे देण्याचा दबाव टाकू नका.