सलग चौथ्या महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, जाणून घ्या नवे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सलग चौथ्या महिन्यात विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने नागरिकांच्या खिशात हात घातला असून स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. एलपीजीच्या 14.2 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 76.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आता आज (1 डिसेंबर) पासून गॅस सिलेंडरची किंमत 670.50 रुपये इतकी झाली आहे.

सर्वसामान्यांच्या खिशाला याचा मोठा फटका बसणार आहे. केंद्र सरकारने महिलांना सुरक्षित आणि स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन पुरविण्याच्या हेतूने उज्वला योजनेतून देशभरात गॅसचे वितरण केले होते. पण आता सातत्याने गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत आहे. तेल कंपन्या दर महिन्याच्या एक तारखेला गॅसच्या किंमती निश्चित करते. त्यातून अनेकदा सातत्याने किंमती वाढ होताना दिसत आहे. मुंबईत गॅस सिलेंडरची किंमत आता 651.50 रुपये झाली आहे.

Visit : Policenama.com