बुरे दिन ! 77 रुपयांनी महागला घरगुती गॅस सिलेंडर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घरगुती गॅस सिलेंडर महाग झाला आहे. यावेळी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलेंडर (14.2 किलो) च्या किमतीत तब्बल 77 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर आता सिलेंडरची किंमत 716.50 रुपये झाली आहे.

यापूर्वी घरगुती गॅस सिलेंडर 639.50 रुपयांना मिळत होता. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (19 किलो) किमती देखील वाढल्या आहेत. आता त्याची किंमत 119 रुपयांनी वाढली आहे. दुकानदारांना आता तो सिलेंडर 1288 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी तो 1169 रुपयांना मिळत होता. दरम्यान, 5 किलोचा लहान सिलेंडरचा भाव 264.50 पर्यंत पोहचला आहे. वाढलेले भाव हे शुक्रवार सकाळपासून लागू होणार आहेत.
स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वेळोवेळी वाढ झाली आहे. 3 महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरमध्ये 105 रुपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये 193 रुपयांची वाढ झाली आहे. 3 महिन्यांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडर 611.50 रुपयांना तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 1095 रुपयांना होतं.

14.2 किलो – 716.50 रुपये
19 किलो – 1288 रुपये
5 किलो – 264.50 रुपये