भारत दौर्‍याव्दारे डोनाल्ड ट्रम्प यांची ‘नजर’ अमेरिकी निवडणुकीवर, US मध्ये राहतात 40 लाख भारतीय

नवी दिल्ली : वृत्त संस्था –अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा अमेरिकेत राहणार्‍या 40 लाख भारतीय लोकांसाठी थेट संदेश असणार आहे. अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. यासाठी तेथील भारतीयांचा कल अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी खुप महत्वपूर्ण ठरणार आहे. भारत-अमेरिका संबंधात दोन्ही देशांच्या लोकांमधील संपर्क नेहमीच महत्वाचा राहिला आहे. सध्या सुमारे 40 लाख भारतीय अमेरिकेत रहात आहेत. यामध्ये खुप मोठी संख्या एनआरआयची आहे. अमेरिकेच्या विविध क्षेत्रात त्यांचे चांगले योगदान आहे. सुमारे दोन लाख भारतीय विद्यार्थी सुद्धा अमेरिकेच्या विविध संस्थांमध्ये अभ्यास करत आहेत. मागच्या निवडणुकीत अमेरिकचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या निवडीत अनेक भारतीयांनी महत्वपूर्ण योगदान दिले होते.

वाढले भारतीयांचे महत्व
जाणकार सांगतात की, रिपब्लिकन आणि डेमोक्रेटीक दोन्ही पक्षामध्ये भारतीय लोकांचे महत्व वाढले आहे. भारतीयांच्या प्रभावी भूमिकेसह मागील दोन दशकात अमेरिकन प्रशासनातही भारतीयांचे महत्व वाढले आहे.

मजबूत संबंध दर्शवतील दोन्ही नेते
सूत्रांचे म्हणणे आहे की, अमेरिकन अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे ज्या लोकांना विविध शंका आहेत, नंतर त्यांची निराशा होईल. कारण हा दौरा आपसातील संबंध मजबूत करण्यात निर्णायक ठरू शकतो. संबंधातील मजबूतीचा संदेश स्वत: अध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून देण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प आपल्या भाषणात दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंधही दर्शवतील.

भारतीयांचे मन जिंकण्याचा प्रयत्न
सूत्रांचे म्हणणे आहे की, अमेरिकचे अध्यक्ष अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममधून अशाप्रकारचा संदेश देतील ज्यातून ते अमेरिकेतील भारतीय लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतील. त्यांनी ह्यूस्टनमध्ये सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या सोबत व्यासपीठावर उपस्थित राहून हाच संदेश दिला होता. ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अध्यक्ष ट्रम्प यांनी व्यासपीठावर अचानक येऊन इस्लामिक दहशतवादावर भाष्य केले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची प्रशंसा केली होती. ट्रम्प, मोदींशी असलेल्या आपल्या संबंधांचाही वारंवार उल्लेख करत असतात.

ट्रम्प ही संधी सोडणार नाहीत
यापूर्वीही अमेरिकन अध्यक्षांचे दौरे संस्मरणीय राहिले आहेत. विशेषकरून क्लिटंन आणि ओबामा यांनी भारतीयांची मने जिंकली होती. म्हणूनच ट्रम्पदेखील ही संधी सोडणार नाहीत.

एकमेकांच्या हिताची चर्चा
सूत्रांच्या माहितीनुसार, दौर्‍याच्या दरम्यान दोन्ही देशांच्या लोकांमध्ये संवाद वाढविण्यावर सुद्धा चर्चा होऊ शकते. सोबतच अमेरिकेतील भारतीयांच्या हिताच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील. एच1बी वीजाच्या मुद्द्यावरही भारत आपली बाजू मांडू शकतो.