ड्रायव्हरनं बनवला चक्क मालकिनीचाच अंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका ड्रायव्हरनं त्याच्याच मालकिनीचा अश्लील व्हिडीओ बनवला आणि तिच्याकडून जवळपास 1 कोटी रुपये उकळले. तिच्या जमिनीचा सौदा करत 50 लाख हडप केले. मुरादाबादमधील मझोला भागातील ही घटना आहे. अनेक वर्षांपासून ब्लॅकमेलिंगला बळी पडलेल्या महिलेनं वैतागून एसएसपींकडे याची तक्रार केली. तपास केल्यानंतर एसएसपींनी ड्रायव्हरसहित इतर 5 लोकांविरोधात गभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यात एका प्रॉपर्टी डिलरचाही समावेश आहे.

असा जिंकला महिलेचा विश्वास
पीडित महिला नागफनी भागातील रहिवासी आहे. 2009 मध्ये तिच्या व्यावसायिक पतीची वैरभावातून हत्या करण्यात आली होती. पतीच्या मृत्यूनंतर ती दीर्घकाळ धक्क्यात होती. कोटींची प्रॉप्रटी सांभाळण्यासाठी घरात एकही पुरुष नव्हता. अशातच पाकबडाच्या डुंगरपूर रोडचा रहिवाशी अर्शदनं तिच्या घरी जाणं-येणं सुरू केलं. तो सहानुभूती व्यक्त करत तिचा विश्वास जिंकू लागला.

महिलेनं त्याला खासगी ड्रायव्हर म्हणून ठेवून घेतलं
अर्शदचा भरोसा पाहून महिलेनं त्याला खासगी ड्रायव्हर म्हणून ठेवून घेतलं. आधी तर अर्शद काम उरकून घरी जायचा. नंतर काहीतरी कारण काढून तो महिलेच्या घरीच राहू लागला. चोवीस तास तिच्या सोबत राहून तो मालकिनीच्या जवळ येऊ लागला. त्यानं विश्वासाच्या मर्यादाही तोडल्या. वाईट काळात त्यानं साथ दिल्यानं महिला त्याच्या हरकतींकडे दुर्लक्ष करत होती.

अर्शदनं मालकिनीचा अंघोळ करताना आणि कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडीओ तयार केला
अर्शदनं एकदा मालकिनीचा अंघोळ करताना आणि कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडीओ तयार केला. व्हायरल करण्याची धमकी देत तो तिला ब्लॅकमेल करू लागला. आतापर्यंत त्यानं तिच्याकडून 1 कोटी रुपये उकळले होते. मालकीनीच्या कोटींच्या जमिनीचा सौदा करत त्यांन सुमारे 50 रुपयेदेखील हडप केले. सततच्या ब्लॅकमेलिंगला वैतागलेल्या महिलेनं अखेर एसएसपी अमित पाठक यांच्याकडे धाव घेतली.

Visit : Policenama.com