गुजरातच्या राजकोटमध्ये 5.8 तर जम्मू-काश्मीरमध्ये 3.0 तीव्रतेचा भूकंप, रात्री 8.13 आणि 8.35 वाजता बसले ‘धक्के’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक वेळा कंपनं झत्तल्यानंतर आज (रविवार) गुजरातमध्ये जमीन हालली. रात्री 8.13 वाजता 5.8 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचं केंद्र राजकोटपासून 122 किलोमीटर उत्तर-उत्तर पश्चिममध्ये सांगितलं गेलं आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे समोर आलेले नाही. दरम्यान, रात्री 8.35 मिनीटांनी जम्मू-काश्मीरमध्ये कटरापासून 90 किलोमीटर दूर 3.0 तीव्रतेचा भूकंप झाला आहे.

भूकंपाचे धक्के बसल्यानंतर लोक घराबाहेर पडले. धक्के खुपच वेगाचे आणि काही सेकंद जाणवले गेल्याचे लोकांनी सांगितले आहे. दरम्यान, आतापर्यंत तरी कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दिल्ली-एनसीआर सोबतच उत्तर भारतामध्ये गेल्या एक-दीड महिन्यात डझनभराहून जास्त छोटे भूकंप झाले. कोरोनाच्या संकट काळात जास्तीत जास्त लोक घरी आहेत. भूकंपामुळे त्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचा जास्त धोका नाही मात्र मोठया भूकंपाच्या धोक्याला कमी केलं जाऊ शकतं.

दरम्यान, रात्री 8.35 मिनीटांनी जम्मू-काश्मीरमध्ये कटरापासून 90 किलोमीटर दूर 3.0 तीव्रतेचा भूकंप झाला आहे.