आर्श्‍चयजनक ! समुद्रात आढळलं १२००वर्षापुर्वीच मंदिर, मौल्यवान वस्तुंसह मिळाले दागिने, तांब्याची नाणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईजिप्तमधील हेराक्लिओन शहरात समुद्राच्या खाली जवळपास १२०० वर्ष जुने मंदिर आढळून आले आहे. इतके जुने मंदीर आढळून आल्याने पुरातत्व विभागाचे लोक हैराण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे या मंदिरात मोठ्या प्रमाणात तांब्याचे शिक्के आणि चांदीचे दागिने आढळून आले आहेत. या मंदिराचा शोध युरोपच्या आणि इजिप्तच्या पुरातत्ववाद्यांनी लावला आहे. समुद्राच्या खाली हे मंदिर आढळून आले असून स्कॅनिंग डिव्हाइसच्या साहाय्याने या मंदिराचा शोध घेण्यात आला आहे.

इजिप्तच्या पुरातत्व विभागाने या मंदिराविषयी माहिती देताना सांगितले आहे कि, समुद्राच्या अटलांटिक क्षेत्रात हे मंदिर आढळून आले आहे. मंदिराचे जे अवशेष सापडले आहेत त्यावरून हे ग्रीक मंदिर असल्याचे सिद्ध होत आहे. हे मंदिर पूर्णपणे नष्ट झाले, असून या मंदिरात तिसऱ्या आणि चौथ्या शतकातील काही मुर्त्या आणि भांडे आढळून आले आहेत. त्याचबरोबर काही तांब्याचे शिक्के देखील आढळून आले आहेत. हि नाणी राजा क्लाडियस टॉलमीच्या कार्यकाळातील असल्याचे सांगितले जात आहे. हे खूप मोठे मंदिर असून या शहराला मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जात असे. मात्र सुनामी आल्यामुळे या शहरातील मंदिरे संपूर्णपणे नष्ट झाली होती.

दरम्यान, पुरातत्ववादी फ्रेंक गोडियो यांच्या मते या जागी १२ वर्षांपूर्वी पहिल्या फ्रेंच युद्धातील अवशेष देखील सापडले होते. जवळपास चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर या १२०० वर्ष जुन्या मंदिराचा शोध लागला. समुद्रात सापडलेल्या या खजिन्यात पुरातन काळातील भांडी, शिक्के,आणि दागिन्यांचा समावेश आहे.

आरोग्यविषयक वृत्त –