उन्हाळ्यात रोज प्या वेलचीयुक्त एक कप चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   उन्हाळ्यात आल्याच्या चहा ऐवजी वेलचीचा चहा सेवन केला पाहिजे. हा चहा बनवताना प्रथम मध्यम आचेवर एका पॅनमध्ये पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात थोडे आले आणि वेलची टाका. गडद रंग येताच दूध टाकून जास्त आचेवर उकळवा. एक उकळी आल्यानंतर बाकीची वेलची टाकून आच कमी करा. 2-3 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या. चहामध्ये वेलची टाकल्याने कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेवूयात.

1 फॅट कमी होते

हिरवी वेलची फॅट वाढू देत नाही. हृदयासंबंधी आजार दूर राहतात. वजन कमी होते.

2 शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात

आयुर्वेदानुसार, हिरवी वेलची शरीरातील विषारी तत्व बाहेर काढते.

3 पोट फुगत नाही

हिरवी वेलची अपचन दूर करते. पोट फुगण्याची समस्या दूर होते. पचन चांगले झाल्याने वजन कमी होते.

4 खराब कोलेस्ट्रॉल घटवते

फॅट कमी करण्याच्या गुणांमुळे वेलची शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. ती एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरायड्स सुद्धा कमी करते.